कंत्राटी शिक्षकांना अखेर मिळाले वेतन  pudhari photo
पालघर

Zilla Parishad teacher payment : कंत्राटी शिक्षकांना अखेर मिळाले वेतन

सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद

पुढारी वृत्तसेवा

पालघर ः सहा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर पालघर जिल्हा परिषदेमधील बाराशे कंत्राटी शिक्षकांना त्यांचे पाच महिन्यांचे थकीत वेतन अदा करण्यात आले आहे. या शिक्षकांची दिवाळी वेतना अभावी कोरडी गेली होती. राज्य शासनाने शिक्षकांची व्यथा लक्षात घेत त्यांचे वेतन मंजूर केले होते, मात्र दिवाळीच्या सुट्टीमुळे हे पगार रखडले होते. त्यानंतर आता जिल्ह्यातील बाराशे कंत्राटी शिक्षकांचे जवळपास 9 कोटी 43 लाख इतक्या रकमेचे पाच महिन्याचे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.

पालघर जिल्हा परिषदेत अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेने कंत्राटी मानधन तत्वावर बाराशे शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. यामध्ये काही शिक्षकांना 16 हजार रुपये प्रति महिना तर काही शिक्षकांना 20 हजार रुपये प्रति महिना वेतन ठरवण्यात आले होते. मात्र या शिक्षकांना जून महिन्याचा वेतन मिळाले होते. मात्र एप्रिल ते सप्टेंबर महिन्यापर्यंतचे वेतन न आल्याने शिक्षकांची अवस्था वाईट झाली होती. काही शिक्षकांचे घर या कंत्राटी नोकरीवरच आहे.

पाच सहा महिने वेतन नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च, शाळांची फी, घर खर्च चालवायचा कसा असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. या शिक्षकांची दिवाळी देखील वेतनाविनाच गेले. दिवाळीच्या आधी राज्य सरकारने कोषागार कार्यालयाला एकूण वेतन जमा केले. मात्र दिवाळीच्या सुट्टीमुळे वेतन होऊ शकले नाही. सुट्टी संपून एक आठवड्यानंतर कोषागार कार्यालयाने वेतन जिल्हा परिषदेच्या वेतन विभागाकडे दिले. जिल्हा परिषदेने तातडीने ही रक्कम आठ पंचायत समित्याकडे पाठवले आणि त्यानंतर ही रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा झाली आहे. सहा महिन्यानंतर वेतन मिळाल्याने कंत्राटी शिक्षक वर्गांने देखील आनंद व्यक्त केला आहे.

  • कंत्राटी तत्त्वावर कार्यरत शिक्षकांचे वेतन रखडल्या बाबतचे वृत्त पुढारीने देखील प्रसिद्ध केले होते. पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभाग कार्यरत 618 पेसा मानधन शिक्षक, 548 कंत्राटी शिक्षक, 34 सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षक अशा एकूण 1200 कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या कंत्राटी शिक्षकांचे एप्रिल ते सप्टेंबर महिन्यापर्यंतचे वेतन देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT