Palghar News Pudhari
पालघर

Palghar News: पालघरमध्ये सातव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील घटना; अपघात की संशयास्पद प्रकार, याचा पोलीस घेत आहेत शोध

पुढारी वृत्तसेवा

पालघर शहर: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतच्या सातव्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना पालघर येथे घडली आहे. अजय असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

पालघर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कामगारांना राहण्यासाठी खाली विकासकांकडून पत्र्याचे शेड तयार करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांत उष्णतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठी कामगार काम सुरू असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यांवर जाऊन झोपत होते.

सोमवारी रात्रीच्या सुमारास अजय लघुशंकेसाठी उठला असता त्याचा अचानक तोल गेला आणि तो इमारतीच्या सातव्या मजल्यावरून थेट खाली पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आली आहे. अजय तोल जाऊन खाली पडल्याने हा अपघात घडला की या घटनेमागे काही संशयास्पद प्रकार आहे याचा शोध, तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT