Fraud News Pudhari
पालघर

Fraud News: पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक; दोन आरोपींना अटक

फसवणुकीत केलेली शंभर टक्के रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

पुढारी वृत्तसेवा

पालघर: पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट व्हॉट्सॲप खाते तयार करून आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी झारखंड राज्यातून अटक केली असून फसवणुकीत केलेली शंभर टक्के रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

पालघर येथील वाघुळसार परिसरात विनीतकुमार मुंशीलाल मीणा (२८)राहतात. एका अज्ञात व्यक्तीने त्यांना व्हाॅट्सअपवरून पालघर जिल्हाधिकारी यांचा नंबर वरून मेसेज केला. स्वतः जिल्हाधिकारी असल्याची खोटी ओळख दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि बँक खाते देऊन त्यावर 50 हजार रुपये पाठवण्यासाठी व्हाॅट्सअपवर मेसेज केला.

त्यानंतर मीणा यांनी सदर बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवले. मात्र जिल्हाधिकारी यांचा फोटो लावून फसवणूक झाल्याचा प्रकार मीणा यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पैसे ट्रान्सफर झालेल्या बँक खातेधारकाची माहिती मिळवून तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. झारखंड राज्यातील धनबाद परिसरातून या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बलवंतकुमार कमलप्रसाद मंडल(26), राजकुमार दुखन रवानी अशी या प्रकरणातील अटक आरोपींची नावे आहेत अटक आरोपींकडून पुण्यात फसवणूक करून घेतलेली 50 हजार रुपयांची शंभर टक्के रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. या याप्रकरणी अधिक तपास प्रदीप पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अतिरिक्त कार्यभार सायबर पोलीस ठाणे करीत आहेत.

सदरची कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा/ अतिरिक्त कार्यभार पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, पो.उ. रोहित खोत, विशाल शिर्के, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश वाघ, पोहवा. संजय धांगडा, कपिल नेमाडे, पोअंमरामदास दुर्गेश्ट, रुपेश पाटील अक्षय शेटे, मपोअं. ऋषिका बारी, स्नेहल शेलार सायबर पोलीस ठाणे पालघर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT