FDA Pudhari
पालघर

Palghar Collector Office: पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपाहारगृहावर एफडीएची कारवाई

उपाहारगृहाचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित

पुढारी वृत्तसेवा

पालघर: पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर असलेल्या उपहारगृहात मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा आणि अस्वच्छता आढळून आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने या विरोधात कारवाई केली असून उपहारगृहाचा परवाना पुढील आदेशापर्यंत तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजल्यावर उपहारगृह आहे. या उपहारगृहात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक दररोज उपहार, जेवण घेत असतात. जिल्हाधिकारी कार्यालयातील या उपहारगृहाची अन्न व औषध प्रशासनाच्या पालघर पथकाने अचानक नुकतीच तपासणी केली.

तपासणी दरम्यान उपहारगृहात मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा आढळून आला. तसेच स्वयंपाकघराची स्वच्छता अत्यंत निकृष्ट असल्याचे, अन्न हाताळणी, साठवणूक व परिसराची स्वच्छता अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच त्याअंतर्गत नियम व विनियमांनुसार समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले.

उपहारगृहात येणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सदर बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने संबंधित कॅन्टीनचा एफएसएसएआय परवाना पुढील आदेशापर्यंततात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. तसेच आढळूनआलेल्या त्रुटींप्रकरणी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT