Boisar jeweller shooting
बोईसर : बोईसर शहरातील गणेश नगर भागात आज (दि.३१) दुपारी थरारक घटना घडली. चतुर्भुज ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानावर काही अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान चोरट्यांनी दोन राउंड फायरिंग करून दहशत माजवली. मात्र, सुदैवाने दुकान मालकाला गोळी न लागल्याने मोठी दुर्घटना टळली.
गोळीबारानंतर घाबरलेल्या चोरट्यांनी गोंधळाच्या परिस्थितीत त्यांची रिव्हॉल्वर घटनास्थळीच टाकून पलायन केल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराला वेढा घालून तपास सुरू केला आहे. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.