Auto Rickshaw Theft
नालासोपारा : आचोळे पोलिसांनी रिक्षा चोरणाऱ्या एका प्रेमवीराला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून सात रिक्षा, एक स्कूटर आणि एक मोबाईल जप्त केला आहे. आचोळे पोलिसांनी पकडलेला हा एक अनोखा चोरटा आहे. रिक्षा चोरून तो विकत नव्हता. त्याने आपल्या प्रेयसीसाठी साठी एक नव्हे तर सात रिक्षा, एक स्कूटर चोरी केली आहे. शशिकांत मलेश कामनोर २४ असं या प्रेमी चोरट्याचं नाव आहे.
शशिकांत मुंबईतील रिक्षा चोरून त्या रिक्षावर प्रवासी भरून भाडे मारायचा. ज्या ठिकाणी रिक्षाचा पेट्रोल किंवा सीएनजी संपेल त्याच ठिकाणी सोडून द्यायचा. जमलेले पैसे घेऊन तो आपल्या गर्लफ्रेंडचे चोचले पुरवायचा शशिकांतची गर्लफ्रेंड आचोळ्यामध्ये राहत होती.
मुंबईतील रिक्षा चोरून आणल्यावर तो आचोळ्या मध्ये उभी करून सोडून द्यायचा. मग पुन्हा जाऊन रिक्षा आणायचा आणि अशाच प्रकारे त्याने तब्बल सात रिक्षा चोरी केल्या आहेत. एक स्कूटर आणि एक मोबाईल चोरी केल्याची कबुली त्यांनी आचोळे पोलिसांना दिली आहे. आचोळे पोलीस ठाणे २, विरार पोलीस ठाणे १, देवनार १, अंधेरी १, बांद्रा २, एम एच बी १, करण्यात आले आहेत.
चोळे येथे राहणारे धर्मेंद्र कनोजिया यांची ३० मे ला मोकळ्या जागेत एवर शाईन येथे पार्क केली होती याचा शोध घेत असताना आचोळे पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही तपासल्यानंतर विरारच्या गुन्ह्यामध्ये आणि आचोळे येथील गुन्ह्यामध्ये एकच व्यक्ती असल्याचे सीसीटीव्ही मध्ये अंधुक दिसली. त्याचा तपास करीत असताना नालासोपारा फायर ब्रिगेडच्या इथे शशिकांत रिक्षा चालवत असताना मिळून आला.
यावेळी पौर्णिमा चौगुले श्रींगी, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२ वसई, उमेश माने पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून सात रिक्षा एक स्कूटर आणि एक मोबाईल असा एकूण पाच लाख पन्नास हजाराचा मध्यमान जप्त केला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.