Antyodaya Yojana
खानिवडे : आगामी पावसाळा आणि पूरपरिस्थितीच्या प्रतिकूल हवामानामुळे कार्यक्षम लॉजिस्टिक्स आणि साठवणुकीसाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी ऑगस्टपर्यंत एनएफएसए अंतर्गत वाटप केलेल्या अन्नधान्याची आगाऊ उचल करण्यास केंद्र शासनाने मंजूरी दिली. दि.30 जून पर्यंत उचल व वाटप करण्याबाबत शानाकडून निर्देश प्राप्त झालेले आहेत.
त्याअनुषंगाने पालघर जिल्हयातील 1 हजार 85 रास्त भाव धान्य दुकानातून अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका 25 किलो तांदुळ व 10 किलो गहू आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 3 किलो तांदुळ व 2 किलो गहू हे तीन महिन्यांचे एकदाच वाटप करण्यात येणार आहे.
जून, जुलै व ऑगस्ट, 2025 करीता रास्त भाव धान्य दुकानदारांच्या पॉस मशिनला धान्य साठा एन्ट्री करण्यासाठी खअशडउच् प्रणालीवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांची संख्या 98 हजार 317, प्राधान्य कुटूंब लाभार्थी संख्या 14 लाख 55 हजार 889,आहेत.