Nirmal Temple Inscription 
पालघर

Nirmal Temple Inscription - निर्मळच्या पुरातन श्री शंकराचार्य मंदिरातील शिलालेखाचा उलगडा

निर्मळच्या पुरातन श्री शंकराचार्य मंदिरातील शिलालेखाचा उलगडा

पुढारी वृत्तसेवा

१९०७ मधील लोकहितकारी कार्याचा ऐतिहासिक पुरावा समोर खानिवडे : पुढारी वृत्तसेवा वसई तालुक्यातील निर्मळ येथील पुरातन श्री शंकराचार्य मंदिरातील पायरीवरील शिलालेखाचा मजकूर यशस्वीरित्या उलगडण्यात इतिहास अभ्यासकांना यश आले आहे.

उत्तर कोकणातील ऐतिहासिक स्थळांचा मागोवा घेणाऱ्या संशोधकांनी पुरातत्त्वीय पद्धतीने शिलालेखाचा छाप घेऊन त्याचे वाचन केले असून, हा शिलालेख ब्राह्मी लिपीत नसून देवनागरी लिपीतील मराठी भाषेतील असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलेआहे.

मंदिराच्या पायऱ्यांलगत असलेल्या ओट्यावर कोरलेला हा सहा ओळींचा तसेच बांधकामातील दगड, चुना आणि सिमेंटमुळे झिजत गेला होता. त्यामुळे अनेक अक्षरे अस्पष्ट झाली होती. संवर्धनाची मागणी अनेक वर्षांपासून होत असताना संशोधकांनी अथक प्रयत्नांतून त्याचा मजकूर वाचण्यात यश मिळविले. शिलालेख अनेक वर्षे पावसामुळे, उन्हामुळे शिलालेखानुसार देऊबाई दामोदर पै यांनी तत्कालीन 'विमल' (आजचे निर्मळ) येथे लोकहितार्थ प्रवाशांच्या विश्रांतीसाठी वटा (ओटा) बांधल्याची नोंद आहे.

हा शिलालेख शालिवाहन शक १८२९, प्लवंग नाम संवत्सर, कार्तिक शुद्ध दशमी, म्हणजेच १५ नोव्हेंबर १९०७ (शुक्रवार) रोजी कोरण्यात आल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे. या शिलालेखामुळे विसाव्या शतकाच्या प्रारंभी सार्वजनिक हिताची कामे धार्मिक प्रेरणेने केली जात असल्याचा पुरावा मिळतो. तसेच स्त्रियांचाही लोककल्याणाच्या कार्यात सहभाग होता, याची ऐतिहासिक नोंद या शिलालेखातून समोर आली आहे.

'विमल' या नावाचा उल्लेख असल्याने निर्मळ गावाच्या ऐतिहासिक नामपरंपरेच्या अभ्यासालाही महत्त्वाची दिशा मिळाली असल्याचा दावा करण्यात आलाआहे. संशोधकांच्या मते हा शिलालेख धार्मिक श्रद्धा, दानधर्म, सार्वजनिक बांधकामांची परंपरा, ग्रामीण सामाजिक जीवन आणि स्थानिक इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पुराभिलेख आहे. या संशोधनामुळे निर्मळच्या ऐतिहासिक वारशात आणखी एका महत्त्वपूर्ण पुराव्याची भर पडली असून शिलालेखाचे तातडीने संवर्धन करण्याची मागणीही पुन्हा जोर धरू लागली आहे. यापूर्वीही या संशोधकांनी विमल, जंजिरे वसई, सिद्धेश्वर, किरवली, दातीवरे, पालघर आदी परिसरांतील सुमारे २० शिलालेखांचा अभ्यास करून त्यांचा इतिहास प्रकाशात आणला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT