नेमबाज संभाजी पाटील 
पालघर

National shooter dies in accident |मुंबई अहमदाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात : राष्ट्रीय नेमबाजाचा जागीच मृत्यू!

नेमबाज संभाजी पाटील जागीच ठार, बालेवाडी क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून होते कार्यरत

पुढारी वृत्तसेवा

पालघर: राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय कनिष्ठ नेमबाजी स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले 27 वर्षीय संभाजी पाटील यांचा कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्वेस गाव हद्दीत हेरिटेज डेअरी समोर फॉर्चूनर आणि हायवा ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाटील याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सकाळी 10 ते अकरा वाजेदरम्यान घडल्याची शक्यता आहे. अपघातात पाटील याचा तेवीस वर्षीय मित्र यश चौधरी जखमी झाला आहे. संभाजी पाटील हे बालेवाडी क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचा नेमबाज संभाजी पाटील आणि त्याचा मित्र प्रणय प्रशांत चौधरी हे दोघे फॉर्च्यूनर कारने (क्र.BR 05 PB 5055 ) गुजरातच्या दिशेने जात होते. याच वेळी दुर्वेश गाव हद्दीत प्रणय याने भरधाव कार दुसऱ्या वाहिनीतून पहिल्या वाहिनीत नेताना समोरच्या हायवा ट्रकचा अंदाज न आल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात नेमबाज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रणय जखमी झाला.

ही घटना घडल्यानंतर महामार्ग पोलीस आणि मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाटील याला रुग्णालयात नेले. मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले. पाटील याच्या मृतदेहाचे शव विच्छेदन करण्यात आले असून त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तेथून ते छत्रपती संभाजी नगर या त्यांच्या मूळ गावी नेले जाणार आहे. या प्रकरणात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक बालाजी मुंढे करत आहेत.

संभाजी पाटील हे भारतीय नेमबाज आहेत 10 आणि 50 मीटर पिस्तूल नेमबाजी प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात 13 जानेवारी 1999 रोजी संभाजी यांचा जन्म झाला असून त्यांनी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय कनिष्ठ स्पर्धा मध्ये भाग घेतला आहे 2016 मध्ये गबाना येथे झालेल्या पंचवीस मीटर पिस्तूलनेंबजीच्या पुरुष कनिष्ठ स्पर्धेत सुवर्णपदक देखील पटकावले होते

2017 च्या कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सांघिक रौप्य पदक मिळवले होते 2025 मध्ये 68 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत विविध आयएसएस कनिष्ठ विश्वचषकांमध्ये संभाजी यांनी सक्रियपणे भाग घेतला आहे अलीकडेच त्यांची राष्ट्रीय नेमबाज म्हणून निवड झाली होती प्रशिक्षक अक्षवे अष्टपुत्रे आणि जसपाल राणा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही मजल मारली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT