जव्हार : तुळशीराम चौधरी
मृत्यूनंतरही, त्या देहाचे हाल, रस्त्याअभावी त्या पाड्यातील त्याच्या घरापर्यंत त्याचा मृतदेह, पोहचविण्याकरिता डोलीतून मृतदेह, न्यावा लागतं असल्याचे चित्र असून, मरणानंतरही शिक्षा अशी वेळ त्या गावातील ग्रामस्थांवर आहे. त्या नारनोली पाड्यात जाण्याकरिता आजही रस्त्याची अवस्था बिकट आहे. यामुळे मरणानंतरही शिक्षा की काय? असा सवाल येथील ग्रामस्थांनी केला आहे. मृतदेहासाठीही डोली, जिवंतांसाठीही रुग्णालयात जाण्याकारिता डोली, मग आमच्या आयुष्याचं काय? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत चांभारशेत पैकी नारनोलीपाड्यात अजूनही रस्ता नसल्याने तेथील कुटूंबाना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. नुकतेच काही दिवसापूर्वी मरण पावलेले त्या नारनोली पाड्यातील ग्रामस्थ, कै. महेंद्र क्ष्मण जाधव यांच्या अचानक निधनानंतर त्यांच्या घराकडे जाण्यासाठी रस्त्याच नसल्याने, ग्रामस्थांनी त्या मृतदेहाला डोलीत बांधून चांभारशेत मुख्यरस्ता त्या मृतदेहाच्या घरापर्यंत डोलीतून मृतदेह पोहचवावा लागतो.
कित्येक वर्षांपासून ह्या पाड्यात जाण्याकरिता रस्ताच नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. अनेक वेळा शासन दरबारी कागदपत्री व्यावहार करूनही, स्वातंत्र्यानंतरही अवस्था बिकट आहे. म्हणून आजही तेथील मृतदेह किंवा एखादा रुग्ण डोलीशिवाय पर्याय नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
ग्रामपंचायत चांभारशेत पैकी नारन-ोली पाड्यात एकूण १६ कुटुंबं घरांची वस्ती आहे, येथे शासनाच्या अनेक सुविधा पोहल्याच नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. आजही येथे मृतदेह डोलीतून न्यावा लागत आहे. यापूर्वी गरोदर मातेला अशाच डोलीतून दवाखान्यात न्यावे लागते, शासन म्हणतं डिझीटल इंडिया. आहो गावांना रस्ते नाहीत, कुठून आली डिझीटल इंडिया असा तेथील काही सुशिक्षित तरुणांचा आरोप आहे. याकडे शासनाने वेळीच लक्ष घालून येथील आदिवासी ग्रामस्थांची समस्या सोडवावी अशी मागणी आहे.
वेदना पुसाव्यात
चांभारशेत नारनोली पाड्यातील ग्रामस्थांचे म्हणणे आम्हाला रस्ता द्या, या मुख्य मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पवार आणि ग्रामपंचायत पिंपळशेत-खरोंडा सरपंच दिनेश जाधव यांनी मागणी केली आहे. याकडे शासनाने आतातरी लक्ष घालावे अशी मागणी आहे. येथील गावकऱ्यांनी केलेला सवाल मृतदेहासाठीही डोली, जिवंतांसाठीही डोली, मग आमच्या आयुष्याचं काय? सरकारने तात्काळ या पाड्याला रस्त्याची सुविधा करून ग्रामस्थांच्या डोळ्यात्तील वेदना पुसाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दहा-पंधरा घरांची वस्ती, तिथे आजही मूलभूत सुविधांचा ओरड आहे. मृतदेह डोलीतून गेला, उद्या गरोदर मातेला अशाच डोलीतून दवाखान्यात न्यायला लागले आहे. सरकारने तात्काळ या पाड्याला रस्त्याची सुविधा करून ग्रामस्थांच्या डोळ्यातील वेदना पुसाव्यात, अशी मागणी आम्ही केली आहे.दिनेश जाधव, सरपंच, ग्रा. पिंपळशेत, खरीडा
गावकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आणि शासनाच्या दुर्लक्षाचा दरारा! आता तरी रस्ता द्या, अन्यथा रस्त्यावर उत्तरणार ग्रामस्था अजूनही शासन आमची मरण्याची वाट पाहतंय की काय? शासनाने लक्ष घालून रस्ता तरी द्यावा.रवींद्र पवार, ग्रामस्थ