पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवंढाणी-बेलपाडा भागात शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास महामार्गावर नादुरुस्त ट्रकला दूध वाहतूक करणार्या भरधाव वेगातील टेम्पोने धडक दिल्याने अपघात झाला. या भीषण अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी अवस्थेत टेम्पोच्या केबिनमध्ये अडकून पडला होता. क्रेनच्या साहाय्याने जखमी टेम्पो चालकाला बाहेर काढण्यात आले. (Latest Palghar News)
शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अवंढाणी गावाच्या हद्दीत महामार्गावर नादुरुस्त अवस्थेत उभ्या ट्रकला टेम्पोने धडक दिली. अपघातात टेम्पोच्या चालक केबिनचा चक्काचूर झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या वाहतूक सुरक्षा पोलीस आणि स्थानिकांनी टेम्पो चालकाला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.
जखमी टेम्पो चालक देवेंद्र जैस्वालला उपचारास वलसाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातग्रस्त टेम्पोत कंपनीच्या दुधाचा पाच हजार लिटर साठा होता. टेम्पो दूध घेऊन नवी मुंबईवरून गुजरात राज्यातील चिखली येथे नेला जात होता.