Mokhada school demolition Pudhari
पालघर

Mokhada school demolition: मोखाड्यातील 67 वर्षांची शालेय इमारत जीर्ण, पाडण्याच्या हालचाली

हजारो विद्यार्थी घडविलेच, तर अनेक विवाह बंधनांचीदेखील साक्षीदार

पुढारी वृत्तसेवा

हनिफ शेख

पालघर: इमारत खरंतर निर्जीव वस्तू मात्र त्या इमारतीत माणसांनी वास्तव्य केल्यानंतर ज्याप्रमाणे माणसांमध्ये नाती संवेदना भावना निर्माण होतात त्याच प्रकारे आपण राहत असणाऱ्या घर किंवा वर्गखोली यांच्यासोबत देखील आपले आपसूकच ऋणानुबंध तयार होतात.

यामुळे अशा इमारती जीर्ण झाल्यानंतर त्या पाडणे किंवा त्याचे नूतनीकरण करणे या दोन्हीही प्रक्रिया करताना जुन्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळतो असेच काहीसे भावनिक वातावरण मोखाडा शहरातील पीएम श्री जिल्हा परिषद शाळा मोखाडा म्हणजेच जीवन शिक्षण शाळा येथील आठ वर्ग खोल्यांचे पाडकाम सध्या हाती घेण्यात येणार असून तशी प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.

तशी या शाळेची स्थापना 1865 ची आहे यावेळी चिरेबंद दगडामध्ये एकच मोठा हॉल बांधण्यात आला होता तिथे शाळा सुरू केली होती. त्याला दगडी शाळा असेही संबोधण्यात येते. नंतर विद्यार्थी वाढत गेले शाळेचा विस्तार झाला आणि त्यानंतर 19 59 मध्ये या आठ वर्ग खोल्या तयार करण्यात आल्या कौलारी असलेली ही इमारत आज 67 वर्षांची झाली आहे.

या वर्ग खोल्या धोकादायक म्हणून सरकारच्या लेखी संबोधण्यात आल्याने आता या वर्ग खोल्या जमीन दोस्त करण्यात येणार आहेत. त्या संदर्भात ग्रामस्थ आणि शालेय शिक्षण समितीची बैठक देखील झाली असून ठराव देखील घेण्यात आला आहे.

कदाचित मोखाडा तालुक्यातील सर्वात जुनी इंग्रज काळात म्हणजेच 1865 साली स्थापना झालेली दगडी शाळा त्यानंतर शाळेचा विस्तार होऊन 67 वर्षांपूर्वी या 8 वर्ग खोल्या या ठिकाणी बांधण्यात आल्या होत्या त्या अगदी गतवर्षीपर्यंत सुरू होत्या या पूर्ण आठही वर्ग असलेली इमारतीचे छत कौलांचे होते अतिशय सुंदर अशी ही शाळा देखणी देखिल होती.

आज मोखाडा तालुक्यातील लोकप्रतिनिधी व्यापारी यशस्वी उद्योजक अशा जवळपास लाखो विद्यार्थ्यांना या शाळेने घडविले यामुळे ही शाळा आणि येथील वर्ग कोणाबद्दल मोखाडा येथील ग्रामस्थांची एक नाळ जोडली गेली आहे.

एवढेच काय तर मोखाडा शहर आणि परिसरात कुठेही लग्नकार्यासाठी जागा नव्हती खाजगी व सरकारी व्यवस्था नव्हती त्यावेळी वधू व वरांच्या खोल्या व समोरील पटांगणात मांडव अशी लग्न देखील याच ठिकाणी होती तर आजपर्यंत ही इमारत हजारोंच्या संख्येने विवाह बंधनात अडकलेल्या जोडप्यांची साक्षीदार देखील आहे.

आम्ही याच इमारतीत शाळा शिकलो आणि याच इमारतीच्या अंगणात माझ्यासारख्या अनेकांचा विवाह देखील झाला आज माझ्या लग्नाला चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत.यामुळे जेव्हा या वर्गखल्या पाडण्याचा विषय आला.तेव्हा खरंच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आज अनेक विद्यार्थी घडविणची साक्ष देणारी ही इमारत माझ्यासारख्या असंख्य विवाह केलेल्या जोडप्यांची देखील साक्षीदार आहे. ती धोकादायक इमारतीमध्ये येत असल्याने पाडली जाणार आहे. मात्र या सोबतच आमच्या असंख्य आठवणी देखील मिळतील याचे दुःख नक्कीच आहे.
- राजेंद्र कटीलकर, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोखाडा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT