Illegal Country Liquor Manufacturing pudhari photo
पालघर

Palghar Crime : गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त; २,५०० लिटर रसायन नष्ट

ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील कडूची वाडी येथील जंगल परिसरात गावठी दारू तयार करण्याची भट्टी आढळून आली. मोखाडा पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान ही कारवाई करत गावठी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे सुमारे २,५०० लिटर गूळ व नवसागर मिश्रित रसायन नष्ट केले. तसेच तयार गावठी दारूचा साठा जप्त करून भट्टीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्यही जागीच तोडूनफोडून नष्ट करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोखाडा पोलीस ठाण्याच्या पथकाकडून ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात येत असताना कडूची वाडी येथील जंगल भागात गावठी दारू तयार करण्याची भट्टी आढळली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे तसेच पोलीस कर्मचारी नवाळे आणि चेतन गुजर यांनी या ठिकाणी कारवाई केली.

या कारवाईदरम्यान घटनास्थळी गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे गूळ व नवसागर मिश्रित सुमारे २,५०० लिटर रसायन आढळून आले. याशिवाय ३० लिटर तयार गावठी दारूही मिळून आली. पोलिसांनी पंचनामा करून तयार गावठी दारू तसेच नवसागर जप्त केला. उर्वरित गूळ व नवसागर मिश्रित रसायन जागीच नष्ट करण्यात आले. गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्यही तोडूनफोडून नष्ट करण्यात आले. या प्रकरणी पंचनामा करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT