खोडाळा : मोखाडा तालुक्यातील मौजे पांगरी या दुर्गम गावात मुलाकडून जन्मदात्या पित्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आला आहे.मात्र हत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
मौजे पांगरी येथील वाळ्या हाडक्या वाजे (47) यांची त्यांचाच मुलगा ईश्वर वाळ्या वाजे (22) याने निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रविवार 1 मार्च 2026 रोजी दुपारी 1-30 ते 2 च्या सुमारास ईश्वर बाळ्या वाजे याने त्याचे वडील वाळ्या हाडक्या वाजे यांचा गळ्यावर कु-हाडीचे घाव घालून खून केला आहे. याबाबतची वास्तविक परिस्थिती जाणून
घेण्यासाठी मोखाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता वरील प्रमाणे प्राथमिक माहिती येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत दहिफळे यांचे कडून मिळालेली आहे. परंतु वस्तुस्थिती निदर्शक माहिती अद्याप हाती आलेली नाही मोखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्य्क पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास व घटनेमागील पार्श्वभूमी समजून घेत आहेत.
दरम्यान जव्हार येथील पोलीस उपविभागीय अधिकारी समीर महेर हे देखील घटनास्थळी घटनेची वास्तविक परिस्थिती पडताळून पहात आहेत.घटनास्थळी वस्तुस्थिती निदर्शक माहिती पोलिसांना मिळाल्यानंतरच त्याबाबतची सविस्तर घटना समोर येणार आहे.