Mithi sludge is being dumped in the rural areas of Kalyan.
नेवाळी: पुढारी वृत्तसेवा
ठाण्याच्या कवयाने त्रस्त असलेल्या कल्याण ग्रामीण भागाला आणखी एका डम्पिंग ग्रासले आहे. मुंबईतील मिठी नदीतील गाळ घेट ठाणे तालुक्यातील पडले गावच्या हद्दीत असलेल्या तावशी येथील खाडीच्या बाजूला टाकण्याचे काम सुरु झाले आहे. या सुरु आलेल्या प्रकाराला मनसेसह ठाकरेंच्या शिवसेनेने कडाडून विरोध यांविला आहे. स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध झुगारून गाळ टाकायला सुरुवात करण्यात आली आहे.
परंतु या प्रकारकडे सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याने विरोधक जन आंदोलन उभारून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भूमिपुत्रांची एकजूट करताना दिसून येत आहेत. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या विण्यात ठाण्याच्या कवण्याचा डम्पिंग ग्राउंड उभारण्यात आला आहे.
तर डायघर येथे कोट्यवधी रुपये खर्जुन सुरू केलेल्या वीज निर्मिती प्रकल्पात कवण्याचे डोंगर निर्माण झाले आहेत. १४ गावातील बंडालीच्या डोंगरावर देखील कवचाचा डोंगर तयार करण्यात आला आहे. भूमिपुत्रांनी कडाडून विरोध केल्यानंतर डायपर आणि भंडाली प्रकल्प बंद केले असले की यामध्ये असलेला कचयाचा साठा जैसे थे आहे.
या प्रकल्पांमध्ये असलेला कचरा उचण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्र करत असताना आता चक कल्याण ग्रामीणच्या पहले गावाजवील तावशी येथे खाडीच्या बाजूला मिठी नदीतील गाळ टाकायला सुरुवात करण्यात आली आहे. ट्रक भान माल दिवा प्रभाग समितीच्या परिसरात टाकण्याचा सपाटा सुरु करण्यात आला आहे. परंतु सत्ताधाग्यांकडून या प्रकारकडे दुर्लक्ष सुरु आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने विरोधकांनी भूमिपुत्रांची डम्पिंग प्रती एकजूट करायला सुरुवात केली आहे. कल्याण ग्रामीण भागावर सुरु असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यारहठी भूमिपुत्रांची एकजूट करायला सुरुवात शाली आहे.
मनसेचे माजी आमदार प्रमोद पाटील यांनी गाळ टाकायला विशेष केल्यानंतर आता ठाकरेंची शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडेंनी देखील प्रकाराला विरोध दर्शविला आहे. त्यांनी थेट गाळ टाकण्याच्या ठिकाणी भेट देत व्हिडिनों समाज माध्यमांवर केले आहेत. पूमिपुत्रांच्या कल्याण ग्रामीण भागावर सत्ताधाऱ्यांकडून सुरु असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विरोधकांनी आवाज उठविला असल्याचे चित्र दिसून येत आहे.