वसई/नालासोपारा : 'वसई, नालासोपारा, विरार भागात गेली ३५ वर्षे एकाच कुटुंबाच्या हाती सत्ता आहे. तरीदेखील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सोयी-सुविधांसाठी झगडावे लागत आहे. यावेळी मतदारांना परिवर्तन हवे आहे. संधी मोदी यांच्या माणसाला, एक मौका मोदी के आदमी को अशा प्रकारचा जनमानसातील सूर मला आज महायुतीचे उमेदवार राजन नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जाणवला, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नालासोपारा-१३२ मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार राजन नाईक यांनी शुक्रवारी सकाळी आपला नामांकन अर्ज सादर केला.
या प्रसंगी पालघरचे विद्यमान खासदार डॉ. हेमंत सावरा, भाजप प्रदेश सचिव व पालघर लोकसभा प्रभारी राणी द्विवेदी आणि महायुतीच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकत्यर्ति मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजन नाईक यांनी आपला अर्ज विरार पश्चिम येथील महापालिका मुख्यालयात निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी शेखर घाडगे यांच्याकडे दाखल केला. दरम्यान; अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित भव्य नामांकन रॅलीत विनोद तावडे, हेमंत सवरा, राणी द्विवेदी, महेंद्र पाटील, राजाराम मुळीक, सुदेश चौधरी, भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज बारोट यांनी दिली.
नवीन दुबे, मनोज पाटील, संतोष धुळे, सतीश वारेकर, जे पी सिंह, जोगेंद्र प्रसाद चौबे, विश्वास सावंत, प्रज्ञा पाटील, नेहा दुबे सहित भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आणि नालासोपारा व विरारवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदा कमळ फुलणार हा विश्वास अधिक दृढ झाला आहे असे खा. हेमंत सवरा म्हणाले.