Rain Pudhari Photo
पालघर

Palghar Rain Alert : पुढचे दोन दिवस पालघर, ठाणे-मुंबईत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

पावसाची शक्यता लक्षात घेता कमाल व किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने घट आणि आर्द्रतेत वाढ होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पालघर शहर : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाच्या परिणामामुळे महाराष्ट्रातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबईकडून प्रसारित हवामान अंदाजानुसार वर्तवण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यासह ठाणे आणि मुंबईमध्ये ही २९ ते ३० ऑक्टोबर दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पावसाची शक्यता लक्षात घेता कमाल व किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने घट आणि आर्द्रतेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळची आर्द्रता ७४ ते ८१ टक्के, दुपारची आर्द्रता ५३ ते ५४ टक्के आणि वाऱ्याचा वेग ४ ते ९ किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता आहे.

पालघर जिल्ह्यात २९ ते ३० ऑक्टोबर दरम्यान पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतातील भात व नागली पीकाची कापणी केली असेल तर सुरक्षित ठिकाणी गोळा करून ठेवा व कापणी केली नसेल तर दोन दिवस पुढे ढकलावे. काढणीस तयार असलेले फळे भाजीपाला व फुलांची काढणी करून घ्यावी. तसेच शेतकर्यांनी जनावरांचा चारा सुरक्षित ठिकाणी ठेवा. असे आवाहन शेतकऱ्यांना जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, पालघर मार्फत करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT