कसारा : कसारा शहराची लोकसंख्या सद्या 60 हजारावर पोहचली आहे. अनेकांनी डोंगर टेकड्या पोखरून घरे बांधली आहेत. मागील दोन वर्षा पूर्वी डोंगर टेकडी वरील 6 घरावर दरड व मातीचा मलबा कोसळल्याने मोठे नुकसान झाले होते. माळीण सारखी परिस्थिती कसाऱ्यात उद्भवली होती मात्र या वर्षी कसाऱ्यातील धोकादायक ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या लोकांना आपत्ती व्यवस्थापन टीम या व्हाट्सअप ग्रुप तर्फे सावध राहण्यासाठी जनजागृती केली त्याच प्रमाणे धोकादायक घरा तील लोकांना रात्रीच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबण्याच्या सूचना केल्या होत्या.
दोन दिवसा पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कसारा तील डोंगर टेकडी वरील घरे पुन्हा चर्चेत आल्याने जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, प्रांत अधिकारी अमित सानप यांच्या आदेशानुसार आज तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी कसारा गावातील धोकादायक घरांची पहाणी केली.
सावधानतेचा इशारा म्हणून कसारा ग्रामपंचायत,वनविभाग व महसूल प्रशासनाने मागील महिन्यात् नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.
मागील पावसाळ्यात रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत् डोंगराचा मलबा कोसळून 40 घरे दडपली गेल्याची दुर्दैवी घटना घडल्याच्या पार्षवभूमीवर आज तहसीलदार कासुळे यांनी कसारा सह शहापूर तालुक्यातील धोकादायक गाव पाड्यांसह, नदी किनाऱ्या लागत च्या गावांची पाहणी केली,व सूचना केल्या. तहसीलदार कासुळे यांनी कसारा येथील धोकादायक घरांची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबण्याबाबत सूचना करून स्थानिक ग्रामसेवक, तलाठी, वनकर्मचारी यांना कसारा शहरातील देऊळवाडी, पाटीलवाडी, पंचशीलनगर, ठाकुरवाडी, शिवाजी नगर, तानाजी नगर, कोळीपाडा येथील धोकादायक घरातील लोकांचा सर्वे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच अतिवृष्टी च्या काळात सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी मुख्यालयी थांबण्याचे निर्देश देखील देण्यात आले.
या वेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या समवेत वनविभागाचे अधिकारी संदीप तोरडमल, नायब तहसीलदार वसंत चौधरी, शंकर डामसे, सरपंच प्रकाश वीर, उपसरपंच शरद वेखंडे, मंडळ अधिकारी चव्हाण, ग्रामसेवक दिनेश पाकळे, तलाठी व महसूल, वनविभाग चे कर्मचारी उपस्थित होते.