तलासरी : राज्यात बंदी असतानाही गुटखा विक्रीसाठी अवैद्य रित्या होणार्या वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई करून गेल्या 8 ते 10 महिन्यात पकडलेला 73 लाख 3 हजार 162 रुपये किंमतीचा गुटखा तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डंपिंग ग्राउंड मध्ये पोलिसांनी खड्डा खोदून खड्ड्यात जाळून माती पुरून नष्ट करण्यात आला.
न्यायालयाच्या निर्णयानंतर अन्न व औषध प्रशासन यांच्या देखरेखीखाली अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे यांच्या उपस्थितीत तलासरी पोलिसांनी नष्ट केला. पकडलेला गुटखा मुद्देमाल नष्ट करताना पर्यावरण प्रदूषणाबाबत योग्य खबरदार घेत पोलिसांनी मुद्देमाल नष्ट केला.
गुटखाबंदी असतानाही जिल्ह्यात गुजरात दादरा नगर हवेली तसेच अनेक भागांत गुटखा विक्री साठी वाहतूक होत असल्याने पोलिस विभागाने विविध ठिकाणी सापळा रचून अनेक महिन्यात गुटख्यावर कारवाई सुरू केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी दुपारी 73 लाख 3 हजर 162 रुपये किंमतीचा गुटखा पोलिसांनी खड्ड्यात जाळून त्यावर माती पुरून नष्ट केला. यावेळी पोलीस निरीक्षक अजय गोरड पोलीस कर्मचारी उपस्थित होते.