खानिवडे : साडेतीन मुहतांपैकी एक असलेला गुढीपाडवा हा आनंदाचा व उत्साहाचा सण आहे. या दिवशी छोटी मोठी वस्तू खरेदी करण्याबा प्रयत्न अनेकांकडून केला जातो. पाडव्याला सोने-चांदी खरेदी दरवर्षी मोठ्या प्रमाणात होते. मात्र यंदा सोन्याचे विक्रमी दर पाहता वसईत सोने विक्रीमध्ये घट झाल्याचे सराफा व्यापायांनी सांगितले. मात्र, दुसरीकडे दुचाकी, चारचाकीच्या खरेदीसाठी अनेकांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला असला तरी गतवर्षी झालेल्या वाहन खरेदीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदी घटल्याचे चित्र होते. गतवर्षी वसई-विरारमध्ये 3620 वाहन खरेदीची नोंद होती. तुलनेत यंदाच्या वर्षी त्यात घट होऊन 2786 इतक्या वाहनांची नोंद झाली आहे.तरीही वसईतील वाहनप्रेमींनी पाडव्या अगोदरच्या दहा दिवसांत नवीन वाहनांची नोंदणी करून पाडव्याला आपल्या घरासामौर नवे वाहन आणले.
पाडव्याच्या दिवशी नवी वस्तू घरात यावी, या हेतूने हजारों वाहन खरेदीदारांनी गेल्या दहा दिवसांत 9 ते 19 मार्च या कालावधीत वसई विरार प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. यामध्ये 1791 दुचाकींची, 567 चारचाकी कारची, 241 अवजड वाहनांची, 169 तीनचाकींची आणि इतर वाहने अशी मिळून 2,786 वाहनांची नवीन नोंदणी केली असल्याचे परिवहन विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.
1,791 दुचाकींची दहा दिवसांत विक्री
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वसईत मागील 10 दिवसांमध्ये सुमारे 1 हजार 791 दुचाकीची विक्री झाली आहे. अनेक ग्राहकांनी दुचाकीची गुढीपाडव्यासाठी बुकिंग करून ठेवली होती. गेल्यावर्षी 3620 वाहनाची पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी झाली होती. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदीत 834 घट झाल्याचे दिसते आहे.
यंदा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तासाठी 2 हजार 786 नवीन वाहनांची नोंदणी विरारच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. त्याबदल्यात 10 कोटी 56 लाख 47 हजार 624 रुपयांचा महसूल वसूल झाला आहे.अतुल आदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी