Palghar News: गडचिंचले घटनेचा मी साक्षीदार, आरोपी नाही! Pudhari Photo
पालघर

Palghar News: गडचिंचले घटनेचा मी साक्षीदार, आरोपी नाही!

काशिनाथ चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला खुलासा

पुढारी वृत्तसेवा

पालघर : दोन दिवसांपासून भाजप प्रवेशामुळे चर्चेत आलेले माजी जिप सदस्य काशिनाथ चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत टीकाकारांना उत्तर दिले आहे. गडचिंचले घटनेचा मी साक्षीदार असून आरोपी नाही, पोलिसांच्या विनंतीवरून साधुंचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होतो, असा खुलासा त्यांनी केला आहे.

डहाणू तालुक्यातील गडचिंचले या ठिकाणी दोन साधूंची हत्या झाली होती. त्याच घटनेचा आधार घेत भाजपावर पर्यायाने चौधरी यांच्यावर आरोप होत होते. याला उत्तर देताना चौधरी यांनी सांगितले की, ही घटना झाली तेव्हा मी माझ्या घरी होतो. मला स्थानिक पोलिसांनी मदतीसाठी लोकांना शांत करण्यासाठी, मला त्यांच्या सोबत नेले होते. तेथील परिस्थिती पाहता प्रचंड लोक होती. काही नशेत होती, ते कोणाचेही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. अशावेळी आमच्या सुद्धा जीवाला धोका निर्माण झाला होता. वनविभाग आणि पोलिसांना सुद्धा मारहाण आणि गाड्यावर दगडफेक झाली होती. माझी

स्वतःची गाडी देखील फोडण्यात आली होती. ही घडना घडून आज पाच वर्ष होत आले. सीआयडी, सीबीआयकडून सुद्धा माझी चौकशी झाली आहे. मात्र आज माझा समाज माध्यमातून थेट आरोपी म्हणून उल्लेख केला जातं आहे. मात्र मी या घटनेचा आरोपी नसून साक्षीदार आहे.यासाठी मला कोर्टाकडून पोलिस संरक्षण देखील दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, चौधरी यांनी पालघर येथे पत्रकार परिषद घेऊन राजकारण बाजूला ठेवा माझ्या परिवाराला यातून प्रचंड त्रास होत असल्याचे सांगितले.

नेमके राजकीय प्रकरण काय आहे ?

पालघर जिल्ह्यातील माजी बांधकाम सभापती तसेच राष्ट्रवादी (शप) चे डहाणू तालुकाध्यक्ष काशीनाथ चौधरी यांनी स्थानिक राजकीय परिस्थिती पाहता भाजप जिल्हाध्यक्ष,भाजपचे खासदार आमदार यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र हा प्रवेश होताच साधू हत्याच्या घटनेत सहभागी असल्याचा आरोप असलेले चौधरी भाजपात गेले असे सांगत विरोधक आणि प्रसार माध्यमांतून हे प्रकरण प्रचंड गाजले. यावेळी भाजप पक्षश्रेष्ठींना त्यांच्या प्रवेशाला स्थगिती देण्यात आली. यावर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलासा द्यावा लागला तर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रियाताई सुळे, रोहित पवार यांनी देखील भाजपवर टीका केली होती.

माझ्या मुलाला हॉस्टेल सोडण्याची वेळ; काशिनाथ चौधरी ढसाढसा रडलेकालपासून समाजमाध्यमांवर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेले काशिनाथ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सुरवातीलाच राजकारण बाजूला ठेवा मात्र या आरोपांमुळे माझ्या अल्पवयीन 17 वर्षांच्या मुलाला त्याच्या कॉलेज आणि हॉस्टेल मध्ये तुझा बाप खुनी आहे, असे सांगून त्रास देत असल्याचे सांगितले. माझी सात वर्षीय मुलगी देखील पप्पा तुम्हाला टीव्हीवर का दाखवत आहेत, असे विचारत आहेत.

माझ्या मुलाला हॉस्टेल सोडण्याची वेळ आली आहे, असे सांगत त्यांना रडू कोसळले. यामुळे मला राजकारणाचा बळी द्यायचा असेल तर द्या, पण माझ्या कुटुंबाला यापासून लांब ठेवा, असे भावनिक आव्हान त्यांनी यावेळी केले. तर मी माझ्या लोकांसाठी काम करत राहणार असून सध्या तरी माझी माझ्या कुटुंबाला जास्त गरज असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

करण्यासाठी, मला त्यांच्या सोबत नेले होते. तेथील परिस्थिती पाहता प्रचंड लोक होती. काही नशेत होती, ते कोणाचेही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. अशावेळी आमच्या सुद्धा जीवाला धोका निर्माण झाला होता. वनविभाग आणि पोलिसांना सुद्धा मारहाण आणि गाड्यावर दगडफेक झाली होती. माझी

स्वतःची गाडी देखील फोडण्यात आली होती. ही घडना घडून आज पाच वर्ष होत आले. सीआयडी, सीबीआयकडून सुद्धा माझी चौकशी झाली आहे. मात्र आज माझा समाज माध्यमातून थेट आरोपी म्हणून उल्लेख केला जातं आहे. मात्र मी या घटनेचा आरोपी नसून साक्षीदार आहे.यासाठी मला कोर्टाकडून पोलिस संरक्षण देखील दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, चौधरी यांनी पालघर येथे पत्रकार परिषद घेऊन राजकारण बाजूला ठेवा माझ्या परिवाराला यातून प्रचंड त्रास होत असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT