हायवा व मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. Pudhari Photo
पालघर

हायवा खाली सापडून बापलेकीचा जागीच मृत्यू !

Palghar Accident News | श्रीघाट गावावर शोककळा, बाजार करुन परत येत असताना अपघात

पुढारी वृत्तसेवा

खोडाळा : खोडाळा येथील आठवडी बाजारातून बाजारहाट करुन घरी येथे जात असताना हायवा ट्रकची दुचाकीला धडक बसून बापलेक जागीच ठार झाल्‍याची घटना घडली आहे. इगतपुरी तालुक्यातील श्रीघाट येथील काशीनाथ लक्ष्मण कौले (४५) व पुजा काशीनाथ कौले (१८) असे ठार झालेल्‍या बाप लेकीचे नाव आहे. बाजार करुन येताना घोटी मार्गे रेती भरून येणाऱ्या हायवाला त्‍यांच्या दुचाकीची समोरून धडक बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

ही घटना शनिवारी दुपारी ३-३० वाजता घडली असून येथील कैलास कौले यांनी या दोघांनाही खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या दोघांनाही मृत घोषित केले .सदर घटनेची माहिती मिळताच खोडाळा पोलिसांनी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले.

खोडाळा पोलिस दुरक्षेत्र यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काशीनाथ कौले आणि पुजा कौले हे दोघे बाप लेक खोडाळा येथील शनिवारच्या आठवडी बाजारातून आठवड्याचा बाजार मिरची मसाला आणि भाजीपाला घेवून घरी श्रीघाट येथे परतत असताना हायवा क्रमांक एम् एच् ०८ ए पी १३३५ व ची धडक त्‍यांची खोडाळा मोटारसायकल क्रमांक एम् एच् १५ एफ् जी ७७०६ याला बसली. या अपघातात बापलेकीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे श्रीघाट येथील कौले कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT