पालघर शहर : पालघर पूर्व परिसरातील असलेल्या जे. पी. उद्योगनगर येथील लिंबांनी सॉल्ट इंडस्ट्री या कंपनीत स्फोट झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. कंपनीत या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून तर इतर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. दीपक अंधेर (35) असे मृत कामगाराचे नाव असून, सुरेश कोम (55) दिनेश गडग (50) लक्ष्मण मंडळ (51), संतोष तरे (46) अशी जखमी कामगारांची नावे आहेत. घटनेची माहिती पोलिसांना व औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकार्यांना मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली. असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
पालघर- मनोर रस्त्यावरील पालघर पूर्व परिसरात जे. पी. उद्योगनगर औद्योगिक या औद्योगिक वसाहतीतील लिंबांनी सॉल्ट इंडस्ट्री या कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या स्फोटात कंपनीतील पाच कामगार भाजल्याने जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोटात जखमी दीपक अंधेर या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जखमी चार कामगारांपैकी सुरेश कोम, दिनेश गडग या दोघांवर पालघर शहरातील ढवळे रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. तर लक्ष्मण मंडळ, संतोष तरे हे दोन कामगार गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर रिलीफ रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.