पालघर ःपालघर नगरपरिषदेत सलग पाच टर्म नगरसेवक आणि चार वेळा उपनगराध्यक्षपद भूषवलेले आणि नावा प्रमाणे कामात उत्तम असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम घरत आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना निवडून देत पालघर नगरपरिषदेवर भगवा फडकवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्याप्रमाणे पालघर जिल्ह्याचाही विकास करणार असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. पालघर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा शनिवारी दुपारी पालघर शहरातील आगरी पाडा मैदानात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. पालघर शहराच्या विकासासाठी नगरविकास विभाग आणि एमएमआरडीच्या माध्यमातून भरपूर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
पालघर शहरातील लोकांना त्रास न देता लोकांसाठी उभा राहणारा उमेदवार तसेच सर्वांना सोबत घेऊन देणारा उमेदवार म्हणून उत्तम घरत यांना निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
स्वाभिमान आणि अभिमान धनुष्यबाण, श्रमजीवी संघटना आणि विश्व हिंदू परिषदेचा पाठिंबा जाहीर केल्या बाबतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार व्यक्त केले. हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचे काम केले आहे. त्यामुळे राम का नही वो कामका नही, असे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र करून राज्य कारभार केला. सर्व जाती धर्माचे राष्ट्र प्रेमी नागरिक आपले आहेत. पालघर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे,मुख्यमंत्री असताना विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला,विकास हाच अजेंडा, मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षाच्या काळात राज्याचा विकास केला, आता डहाणूपर्यंत विकासाची गंगा आणायची आहे. येत्या काळात नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याच्या माध्यमातून विकास कामे पूर्ण करू असे सांगितले.
जिंदाल बंदर प्रकल्पात मच्छीमार बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही, कुठलाही प्रकल्प विरोधात होऊ देणार नाही, परिसर भकास करून विकास करणार नाही. सर्व ठिकाणी लोकांभिमुख आणि कल्याणकारी योजना राबवल्या. लाडकी बहीण योजना राबवताना आलेल्या अडचणीवर मात केली. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. लाडका भाऊ ओळख सर्व पदांपेक्षा मोठी असे सांगितले. पालघर ,ठाणे जिल्हा जुळी भावंड असून त्यांचा विकास झाला पाहिजे. गुरचरण जागांचे सीमांकम, सर्व धर्मीय स्मशानभूमी,नाट्यगृह, पाणीपुरवठा योजनेसाठी पाणीसाठा मंजूरी दिली जाईल.पालघरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी 28 कोटी उपलब्ध करून दिले. सत्तेवर पाणी सोडून शिवसेनेत उठाव केला. त्यावेळी पन्नास आमदार सोबत होते. सत्ता सोडण्याची हिंमत मी करून दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीत 80 जागा लढवून 60 जागांवर वीजय मिळवला.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या मतदारांनी विश्वास दाखवत शिवसेनेला भरघोस मतदान केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांचे हिंदुत्व आणि विचार विकास घेऊन वाटचाल करीत आहोत.शिवसेना विकासाला चालणार देणारी संघटना असुन जिथे आपत्ती तिथे शिवसेना, असे समीकरण राज्यात निर्माण झाले आहे. यावेळी आमदार राजेंद्र गावित, रवींद्र फाटक,जगदीश धोडी,कुंदन संखे, साईराज पाटील, शिंदे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम घरत, नगरसेवक पदाचे उमेदवार,पदाधिकारी उपस्थित होते.
विश्व हिंदू परिषदेचे मुकेश दुबे ,श्रीराम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचा गदा आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार केला, तसेच नगरपरिषद निवडणुकीत शिंदे सेनेच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. स्वामी पद्मानाभ स्वामी मंदिराला तीर्थक्षेत्र म्हणून मंजुरी दिली असून विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले.