पालघर : शिंदे गटाचे दीपेश म्हात्रे ठाकरे गटात File Photo
पालघर

पालघर : शिंदे गटाचे दीपेश म्हात्रे ठाकरे गटात

मोनिका क्षीरसागर

ठाणे : शिंदे गटाचे डोंबिवलीतील युवा नेते आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी रविवारी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ते डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समर्थकांनी त्यांच्या प्रवेशबंदीची घोषणा केली आहे.

यामुळे डोंबिवलीतील राजकारण तापले आहे. ते आपल्या समर्थक दोन नगरसेवकांसमवेत तर सात समर्थक नगरसेवकांसमवेत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे डोंबिवलीत आता भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार हे निश्चित झाले आहे. रवींद्र चव्हाण हे भाजपचे कोकणातील ताकदवान नेते आहेत.

त्यांच्याकडे पालघर आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रीपद आहे. त्यामुळे त्यांना कोण आव्हान देणार हा आतापर्यंतचा प्रश्न होता मात्र आता दीपेश म्हात्रेंच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे डोंबिवलीच्या लशीतील उमेदवार निश्चित झाले आहे. म्हात्रे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT