पंचायत समिती परिसरातील काँक्रीटीकरण बनले डोकेदुखी File Photo
पालघर

पंचायत समिती परिसरातील काँक्रीटीकरण बनले डोकेदुखी

पुढारी वृत्तसेवा

वाडा : वाडा शहरातील पंचायत समिती परिसरात काँक्रीटीकरणाच्या कामासाठी जागोजागी खोदकाम करण्यात आले आहे. कंत्राटदाराकडून मात्र कासवगतीने काम सुरू असल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांची ये जा मंदावली असून केलेल्या खोदकामाने अनेक वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

वाडा शहरातील सर्वच रस्त्यांचे काँक्रीटीकरण जोमाने सुरू असून सर्व शहरात विकासकामांसाठी काँक्रीटचे जणू जंगल उभे राहत आहे. पंचायत समिती परिसरात पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय तसेच शासकीय गोदाम असून याच भागात लोकांची रहदारी अधिक काँक्रीटीकरणासाठी असते.

अनेक दिवसांपासून या परिसरात जागोजागी खोदकाम करण्यात आले असून त्यात केवळ लहान दगड टाकून अन्य काम स्थगित आहे. पंचायत समिती परिसरात खरेतर रातोरात काम करणे गरजेचे असताना कंत्राटदाराने केलेली दिरंगाई लोकांना भोगावी लागत आहे.

कार तसेच दुचाकींना अर्धवट सोडलेल्या कामामुळे मनस्ताप सहन करावा लागत असून अनेकदा कार रस्त्यावर घसरून पडतात असेही लोकांचे म्हणणे आहे. नगरपंचायत विभागाने याबाबत तात्काळ कंत्राटदाराला सूचना देणे गरजेचे असून लोकांची त्रासातून सुटका करावी अशी मागणी केली जात आहे.

शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट

वाडा शहरात मागील तीन वर्षात जागोजागी रस्ते काँक्रीटीकरण करण्याचा सपाटा नगरपंचायत विभागाने लावला असून अतिशय मनमानी पद्धतीने असल्याची कामे केल्याने अनेक रस्ते आपले रंग दाखवू लागले आहेत. नको तिथे रस्ते झाले मात्र रहदारीच्या शास्त्रीनगर सारख्या भागात अजूनही लोकांना रस्त्यांची प्रतीक्षा आहे. कोट्यवधींचा निधी खर्चूनही शहराला निकृष्ट रस्ते मिळात असल्याने याबाबत लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून बोगस कामांचा हिशोब घेणार कोण असा प्रश्न लोकांना पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT