पालघर

Palghar News : बोईसरमध्ये सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडिओमुळे तणाव; आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

बोईसर : बोईसर शहरातील गणेश नगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तीने महामानव तसेच जतीवाचक व अल्पसंख्याक समुदायाबाबत अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, गणेश नगर येथे राहणाऱ्या रूपेश झा या व्यक्तीने त्याच्या अधिकृत फेसबुक खात्यावर एक व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडिओमध्ये महामानव यांच्याबद्दल तसेच एका जातीबाबत आणि अल्पसंख्याक समुदायाबाबत आक्षेपार्ह व अश्लील भाषेचा वापर केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणामुळे संबंधित व्यक्तीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना लेखी तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत तसेच इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, बोईसर शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शहरातील प्रमुख भागांमध्ये पोलिसांचा वेढा घालण्यात आला असून नागरिकांनी शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पालघर येथून पोलीस अधीक्षकांसह मोठा पोलिस बंदोबस्त बोईसरच्या दिशेने रवाना करण्यात आल्याची माहिती समोर येत असून परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT