मोखाडा : दर पावसाळ्यात जव्हार मोखाडा या भागातील वीज जाण्याचे प्रमाण अतिशय जास्त असल्यामुळे थोडा वादळी वारा झाला किंवा पावसाचे प्रमाण वाढले की या भागातील वीज नेहमीच गायब होते. यावर खरंतर तोडगा काढण्याऐवजी वर्षानुवर्षी हीच स्थिती या भागाची राहिलेली आहे. यामुळे 2022 मध्ये डहाणू वरून थेट जव्हार येथे उपकेंद्राला वेगळा वीजपुरवठा होण्यासाठी जे काम हाती घेण्यात आले 132 केवीचा उपकेंद्र ज्वारीतील जामसर या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपूर्वीच तयार झालेले आहे. मात्र तिथून जव्हार, मोखाड्यासाठी होणारा वीजपुरवठा अद्याप झालेला नाही मात्र हे काम चालू असल्याचे नेहमी सांगण्यात येते. त्यामुळे जव्हार मोखाडाकरांना हक्काचा वीज पुरवठा कधी होणार?असा सवाल नागरिक करत आहे.
याबाबत माहिती घेतली असता हे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान महावितरण आणि संबंधित ठेकेदार कंपनीवर आलेले आहे. कारण की आज घडीला हे काम पाहता संत गतीने असल्यामुळे मार्च 2026 पर्यंत तरी हे काम पूर्ण होईल का याबाबत सांशकता निर्माण झाली आहे यामुळे जव्हार मोखाड्यासाठी मिळणारा हक्काचा वीजपुरवठा नेमका कधी होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
आज घडीला जव्हार मोखाड्यासाठी कोणाला वीज पुरवठा हा डहाणू गंजाड कवडास मार्ग होतो. यामुळे डहाणू भागात जरी पाऊस झाला आणि तिकडे एखादं झाड लाईनवर पडल किंवा विविध प्रकारची नादुरुस्ती झाली तरी जव्हार मोखाडा तालुक्याला संपूर्ण दिवस अंधारात राहावे लागते यामुळे जव्हार मोखाडासाठी स्वतंत्र वीजपुरवठा असावा या हेतूने शासनाने गेल्या कित्येक वर्षांपूर्वीच जव्हार मध्ये एका वीज उपकेंद्राची निर्मिती झाली मात्र तिथपर्यंत वीज जोडणी अद्याप झालेली नाही.
सध्या या 40 किलोमीटर लाईनचे काम चालू आहे डिसेंबर 2022 मध्ये या कामाची सुरुवात झाली आहे या लाईन मध्ये चार आउटलेट होणार असून वनविभागाच्या जागेतून तब्बल 17 किलोमीटर तर त्या व्यतिरिक्त 16 किलोमीटर अशी ही लाईन खेचली जाणार आहे यासाठी वनविभागाच्या 48 हेक्टर जागेचा वापर होणार आहे.
एकूण 148 वीज पोलाची निर्मिती होणार असून यामधील वनविभागाच्या जागेत 100 आणि त्या व्यतिरिक्त 48 असे पोल उभे राहणार आहेत. यातील आज घडीला 69 पोल बसविण्याचे काम झालेले असून यातील 41 वन विभागा व्यतिरिक्त क्षेत्राच्या जागेत तर तर 15 वनक्षेत्राच्या हद्दीत वीज खांब उभे करण्यात आलेले आहेत. आता पुढील कामासाठी लागणारी वनविभागाची परवानगी मिळालेली असून उत्तर दक्षिण तथा सावा वनविभागात काही झाडांची छाटणी चे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात येत आहे.