नालासोपाऱ्यात एकाच घरातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू File Photo
पालघर

Accident : नालासोपाऱ्यात एकाच घरातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेकडील हनुमान नगर परिसरातील जय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एकाच घरातील २० ते २५ वयोगटातील दोन तरुणांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास श्रीप्रस्था येथील नव्या रस्त्यावर घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांच्या नातेवाईक व घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जय अपार्टमेंटमध्ये राहणारे धीरज गोईल व हिरेन घुघल हे २० ते २५ वयोगटातील तरुण हे बुधवारी रात्री विरारवरून दुचाकीने घरी येत होते. रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास श्रीप्रस्थाच्या नव्या बनविण्यात

आलेल्या रस्त्यावरून येत असताना यशवंत गौरवकडून येणाऱ्या एका चार चाकी गाडीला जोरदार धडक देऊन अपघात घडला. या अपघातात नियंत्रण न झाल्याने दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आले. नालासोपारा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

या अपघातानंतर या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून अनेकांचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या रस्त्यावर गतिरोधक व सफेद पट्टे मारण्यात यावे जेणेकरून हे अपघात होणार नाही याची दक्षता मनपाने घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT