खानिवडे : पालघर जिल्ह्यातील रब्बी पिके यंदा म्हणावी तशी पिकली नाहीत त्यांना ऐन मोसमात येणारा फुलोरा गळून पडल्याने रब्बी च्या कडधान्य पिकांवर परिणाम झाला. यामुळे कडधान्यातील वाल, तूर, मूग, उडीद राई, चणा हे पीक नेहमीपेक्षा कमी उत्पादित झाले. नाही म्हणायला चवळी तेव्हढी चांगली झाली . मात्र आताही शाकाहारी अथवा मांसाहारी भाजीत सर्वांना आवडणारा गोड चवीचा वरवा हिरव्या बहराने आताही बहरलेला दिसत असला तरी त्याला फुलोराच धरला नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान आपल्या आंबट गोड चवीने सर्वांना भुरळ घालणाऱ्या पालघरच्या मातीतील मूळ फळ म्हणून रानावनात असलेल्या रायवळी आंब्यांना मात्र चांगलाच बहर आल्याचे दिसून येत आहे. जंगलची काळी मैना करवंदे, तोरणे, हाटूरणे, कोसमा अलवा शिवणा आदी रानमेव्यावर वातावरण बदलाबरोबर वणव्यांची भाजकी आच त्यांना जाळून गेली. त्यामुळे त्यांचेही उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटले आहे. याचा थेट परिणाम हा रानाशी निगडित निर्माण होणाऱ्या रोजगारावर झाला आहे.
रानमेवा गोळा करणाऱ्यांना यंदा दरसालपेक्षा अधिक पायपीट करून रानमेवा मिळवावा लागत आहे. आधी मोहोर करपला त्यातही तग धरून फळबागांना धरलेली फळे मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने यंदा कलमी आंबा, पेरू, चिक्कू, पपई, चिंच, जांभूळ यांचे उत्पादन कमालीचे घटणार आहे असं असलं तरी आपल्या आंबट गोड चवीने सर्वांना भुरळ घालणाऱ्या पालघरच्या मातीतील मूळ फळ म्हणून रानावनात असलेल्या रायवळी आंब्यांना मात्र चांगलाच बहर आल्याचे दिसून येत आहे. मात्र वातावरणात होणाऱ्या बदलानूसार पिक कसे तग धरतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकंदरीत यंदा सतत बदलणाऱ्या हवामानाचा फटका सर्व पिकांवर कमी अधिक प्रमाणात बसला आहे.शेतीला शाश्वत सिंचन सुविधा आणि सलग वीज पुरवठा मिळणे आवश्यक
आहे. यासह फळांसाठी कोल्ड स्टोरेज आणि प्रक्रिया उद्योग उभे झाल्यास
शेतकऱ्यांची उन्नती होवू शकते.
टाळ शकते.
बाळू सांबरे, शेतकरी
शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा. यासह फळपिकांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी उभारणी होणे आवश्यक आहे.प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते.
शेतीला शाश्वत सिंचन सुविधा आणि सलग वीज पुरवठा मिळणे आवश्यक आहे. यासह फळांसाठी कोल्ड स्टोरेज आणि प्रक्रिया उद्योग उभे झाल्यास शेतकऱ्यांची उन्नती होवू शकते. टाळ शकते.बाळू सांबरे, शेतकरी