Tulinj Missing Girl Pudhari
पालघर

Tulinj Missing Girl: चॉकलेट आणण्यासाठी घराबाहेर पडली, परतलीच नाही; तुळींजमध्ये ८ वर्षीय मुलीचे अपहरण

फिर्यादीची आठ वर्षांची मुलगी घरातून किराणा दुकानात चॉकलेट आणण्यासाठी गेली होती.

पुढारी वृत्तसेवा

नालासोपारा: किराणा दुकानातून चॉकलेट घेऊन येते, असे सांगून घराबाहेर पडलेली अवघ्या आठ वर्षांची चिमुकली बेपत्ता झाल्याने तुळींज परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत आमिष दाखवून तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीची आठ वर्षांची मुलगी घरातून किराणा दुकानात चॉकलेट आणण्यासाठी गेली होती. मात्र बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला; मात्र मुलीचा ठावठिकाणा लागला नाही.

त्यानंतर अज्ञात व्यक्तीने तिला आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची शक्यता व्यक्त करत तुळींज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. घटनेनंतर तुळींज पोलिसांकडून मुलीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून परिसरातील नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT