तलासरी : तलासरी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून मुंबई अहमदाबाद महामार्ग शेजारील तलासरी इभाडपाडा येथील एका हॉटेल जवळ गांजा खरेदी विक्रीच्या उद्देशाने आलेल्या दोघांना अटक केली. त्याच्याकडून तब्बल 2 किलो 330 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई रविवारीसकाळी करण्यात आली.
संतोष दुर्योधन स्वाइन (38) आणि बापटीस धोडी (24) असे अटक केलेल्या आरोपलींचे नावे आहे. आरोपी कडून 2 किलो 330 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांच्याकडून 4 लाख 66 हजार 60 रुपये किंमतीचा गांजा, 29 हजार 500 रोख रुपये, दोन मोबाईल फोन, दोन दुचाकी वाहन असा एकूण 3 लाख 94 हजार 160 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या दोन्ही आरोपीस अटक करून त्यांचेविरूध्द तलासरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पालघर पोलिस अधीक्षक यतीन देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, विभागीय पोलिस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय गोरड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे, पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे, जयराम ओमतोल, आदींनी केली आहे.