उत्तर महाराष्ट्र

‘शिक्षक सेने’चा राज्यात ७ लाख वृक्षारोपणाचा संकल्प ; अध्यक्ष अभ्यंकर यांची माहिती

गणेश सोनवणे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

शिक्षक सेने तर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त शिक्षक सेने तर्फे राज्यात दि. २७ जून ते  दि. २७ जुलै पर्यत शाळा महाविद्यालय परिसरात ७ लाख वृक्षारोपण व संवर्धन करण्यात येणार आहे. या मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी केले.

मुंबई येथे शिक्षक सेनेच्या सभेत मार्गदर्शन करतांना ज. मो. अभ्यंकर समवेत संजय चव्हाण, शिवाजी शेंडगे, अमित चव्हाण, नितीन चौधरी, ज्ञानेश्वर म्हात्रे आदी.

शिक्षक सेना राज्य कार्यकारिणीची सभा रविवारी मुंबई येथे आयोजित केली होती. त्यावेळी अभ्यंकर यांनी आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर सरचिटणीस रमेश चौघुले ( सोलापूर ), उपाध्यक्ष संजय चव्हाण (नाशिक), शिवाजी शेंडगे (मुंबई), अमित चव्हाण (मुंबई), नितीन चौधरी, ज्ञानेश्वर म्हात्रे आदी उपस्थित होते.

सभेचे प्रास्तविक राज्य उपाध्यक्ष संजय चव्हाण यांनी केले. यावेळी शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दि. २७ जुलै रोजी असलेला वाढदिवस हा प्रेरणा दिवस म्हणून शिक्षक सेने तर्फे साजरा करण्यात येणार आहे. याअंतर्गत दि.२७ जून ते  दि. २७ जुलै पर्यत राज्यभरातील विविध शाळा महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यात समन्वयक नियुक्त केले आहे. तसेच मागील वर्षी ४ लाख ८४ हजार वृक्षरोपण केले होते. त्यांचे संवर्धन करण्यात आले असल्याची माहिती अभ्यंकर यांनी दिली.  या मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन अभ्यंकर यांनी केले. या वेळी सरचिटणीस रमेश चौघुले यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी नाशिकचे कलीम अन्सारी, मधुकर वाघ राम, धोंगडे संदिप पांडे उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT