नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक येथे गेल्या ७ वर्षापासून लेखन क्षेत्रात कार्यरत असताना सामजिक कार्यातून आपल्या कामाचा ठसा उमविणाऱ्या लेखिका मृणाल पाटील यांना दिल्ली स्थित राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने पुरस्कार जाहीर झाला आहे. विविध वृत्तपत्रे, सदर, दिवाळी अंकांच्या माध्यमातून मृणाल पाटील यांचे लेख प्रसिद्ध झाले असून प्रसंगानुरूप लेख असल्याने वाचकांना भावले जातात.
मृणाल पाटील या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई च्या माध्यमातून राज्यस्तरीय आदर्श युवती महाराष्ट्र युथ आयडॉल विशेष गुणरत्न पुरस्कार, दि. महाराष्ट्र एज्युकेशन संस्था, चांदोरी च्या वतीने महिला सन्मान पुरस्कार, लायन्स क्लब नाशिकच्या वतीने महिला दिन विशेष पुरस्कार, दलित आदिवासी क्रांती दल, महाराष्ट्र राज्यच्या वतीने राज्यस्तीय युवा संघर्ष पुरस्कार, श्री साई बहुउद्देशीय संस्थेकडून राष्ट्रीय अहील्यारत्न पुरस्कार, राज्यस्तरीय कोविड योद्धा समाज रक्षक महासन्मान, राष्ट्रीय समाज गौरव गोल्ड मेडल अवॉर्ड, क्षितिजा महिला सन्मान, राष्ट्रीय यशवंत रत्न पुरस्कार, जिजाऊ गौरव पुरस्कार, कसमादे गौरव पुरस्कार २०२२ आदी पुरस्कारांच्या मृणाल पाटील या मानकरी ठरल्या आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल खासदार अमोल कोल्हे, ॲड. पंकज पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार इंगळे आदींनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.