नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात बुधवारी (दि.15) नव्याने 14 कोरोना बाधित आढळून आले असून, 13 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपर्यंत 108 बाधितांवर उपचार सुरू होते. बुधवारी दिवसभरात 11, मालेगावमध्ये एक व परजिल्ह्यातील दोन कोरोना बाधित आढळून आले आहेत. एकूण बाधितांपैकी 21 बाधितांमध्ये लक्षणे आढळून आली असून, त्यापैकी एकास ऑक्सिजनची आवश्यकता भासली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या चार लाख 76 हजार 282 इतकी झाली असून, त्यापैकी चार लाख 67 हजार 275 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 364 संशयितांचा अहवाल प्रलंबित आहे.