नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील कुंदेवाडी येथे 14 वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
करण निवृत्ती बर्डे (14) असे मृत मुलाचे नाव आहे.
त्याने राहत्या घरातील आढ्याला स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे वडील निवृत्ती वामन बर्डे यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. हवालदार सारुक्ते पुढील तपास करीत आहेत.