उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ‘एनडीएसटी’साठी यंदा तिरंगी लढत ; वाचा जाहीर उमेदवारांची नावे

गणेश सोनवणे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील अकरा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची अर्थवाहिनी असलेल्या एनडीएसटी सोसायटीत 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी तीन पॅनलची निर्मिती झाली असून, त्यांनी आपापले उमेदवारही जाहीर केले आहेत. निवडणुकीसाठी फक्त नऊ दिवस मिळणार असल्याने तीनही पॅनलच्या उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढविला आहे.

एनडीएसटी सोसायटीत सत्ताधारी असलेले महाराष्ट्र राज्य टीडीएफ, शिक्षक सेना, मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर संघटना, आश्रमशाळा संघटना व समविचारी संघटनेद्वारे पुरस्कृत टीडीएफ प्रगती पॅनल तयार करण्यात आलेले आहे. या पॅनलचे नेते माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, कचेश्वर बारसे, संजय चव्हाण, बाळासाहेब सूर्यवंशी, शिवाजीराव निरगुडे, रवींद्र मोरे. इ. के. कांगणे या नेत्यांनी 21 जागांसाठी 21 उमेदवार जाहीर केले आहेत.

पीडीएफ/डीसीपीएस पॅनलचे 12 उमेदवार
एनडीएसटी सोसायटी निवडणुकीत पीडीएफ/डीसीपीएस या नावाचे तिसरे पॅनल आहे. या पॅनलचे नेते फिरोज बादशाह, प्रकाश सोनवणे आणि आर. डी. निकम यांच्या नेतृत्वाखालील पीडीएफ/डीसीपीएस या तिसर्‍या पॅनलतर्फे फक्त 12 उमेदवार जाहीर करण्यात आले. चांदवड- यू. के. आहेर, येवला – अरुण विभुते, दिंडोरी – सोमनाथ धात्रक, देवळा, कळवण, सुरगाणा-राकेश आहिरे, मालेगाव-सुधीर पाटील, जयेश सावंत, नाशिक-तुषार पगार, हेमंत पाटील, नीलेश ठाकूर, महिला-सीमा देवरे, अनुसूचित जाती/जमाती-स्नेहलता पवार, इतर मागास प्रवर्ग-वासुदेव बधान सोसायटीची निवडणूक 17 जुलै रोजी होत असून, निवडणुकीसाठी फक्त नऊच दिवस मिळणार असल्याने तीनही पॅनलच्या उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवून शाळांना भेट देत आहेत. उमेदवार तेथील मतदारांना मतदानासाठी आवाहन करत आहेत.

परिवर्तन पॅनलतर्फे 21 उमेदवार :
एनडीएसटी विकास समिती पुरस्कृत माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनलचे 21 जागांसाठी 21 उमेदवार डॉ. हिरे यांनी घोषित केले. यावेळी पॅनलचे नेते श्याम पाटील, के. के. अहिरे, साहेबराव कुटे, एस. बी. देशमुख, डी. यू. अहिरे, पुरुषोत्तम रकिबे, विजय पाटील, भगवान पानपाटील, प्रमोद पाटील आदी नेते उपस्थित होते.

नाशिक सर्वसाधारण-संग्राम करंजकर, संजय पाटील, सचिन सूर्यवंशी, त्र्यंबक पेठ- शुभांगिनी पवार, दिंडोरी – लोकेश पाटील, सटाणा – सचिन शेवाळे, कळवण, सुरगाणा, देवळा – बी. एन. देवरे, जी. टी. पगार, मालेगाव – संजय मगर, प्रकाश भदाणे, चांदवड – सचिन पाटील, नांदगाव- बाळासाहेब भोसले, येवला-बाळासाहेब मोरे, निफाड-शंकर सांगळे, सिन्नर – दत्ता वाघे पाटील,इगतपुरी-प्रशांत आहेर, महिला प्रतिनिधी – अरुणा खैरनार, सविता देशमुख, अनु. जाती. जमाती – उत्तम झिरवाळ, एन. टी. – गोरख कुनगर, ओबीसी – राजेंद्र लोंढे.

टीडीएफ प्रगती पॅनलचे उमेदवार
नाशिक सर्वसाधारण गट-निंबा कापडणीस, सचिन पगार, चंद्रकांत सावंत, इगतपुरी-बाळासाहेब ढोबळे, त्र्यंबक पेठ-प्राचार्य दीपक व्याळीज, दिंडोरी-विलास जाधव, सटाणा-संजय देसले, कळवण, सुरगाणा, देवळा -शांताराम देवरे, संजय पाटील, मालेगाव- संजय वाघ, मंगेश सूर्यवंशी, चांदवड-ज्ञानेश्वर ठाकरे, नांदगाव-अरुण पवार, येवला-गंगाधर पवार, निफाड-समीर जाधव, सिन्नर-दत्तात्रय आदिक, महिला प्रतिनिधी-विजया पाटील, भारती पाटील अनु जाती. जमाती-अशोक बागूल एनटीमधून-मोहन चकोर, ओबीसी-अनिल देवरे या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT