उत्तर महाराष्ट्र

जळगाव : नोकरीच्या आमिषाने तरुणीची फसवणूक

मोहन कारंडे

जळगाव : नोकरीचे आमिष दाखवत जळगाव शहरातील टागोरनगर येथील तरुणीची 2 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील रवीना बावणे ही तरुणी 26 मे रोजी ऑनलाईन सर्च इंजिनवर जॉब शोधत असताना इंडिया जॉब पोर्टलवर नर्सिंग पोस्टसाठी रिक्त जागा दिसून आली. त्यावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तिने संपर्क साधून नोकरीबद्दल विचारपूस केली. फोनवरील महिलेने संबंधित रिक्त जागेची माहिती दिल्यानंतर कागदपत्रांची मागणीसह सुमारे 3 लाख रुपयांचा खर्च येईल असे सांगितले. त्यानंतर संबंधित महिलेने रवीनाचा विश्वास संपादन करून तिच्याकडून नोकरी लावून देण्याचे आमिषासाठी एकूण 2 लाख 60 हजार रुपये तरुणीकडून उकळले.

SCROLL FOR NEXT