जळगाव ; पुढारी वृत्तसेवा : चाळीसगाव शहरातील तरुणाने आपल्या राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, चाळीसगाव शहरातील जय बाबाजी चौक येथील महेश विजयसिंह राजपूत (वय-२२) या तरुणाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
या घटनेची माहिती मिळताच वार्डातील नगरसेवक प्रदीप राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या घटनेची माहिती चाळीसगाव शहर पोलिसात दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.
चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
हेही वाचलं का ?