जळगाव: पुढारी वृत्तसेवा: दुचाकीचा कट लागल्याने झालेल्या वादातून २० वर्षीय तरुणास बेदम मारहाण करण्यात आली. यात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे आज (दि ७) घडली आहे. नामदेव अशोक कोळी (वय २०, रवंजे, ता.एरंडोल) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नामदेव कोळी या तरुणाचा शुक्रवारी सकाळी रवंजे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ दुचाकीचा कट लावण्यावरून वाद झाला. त्यामुळे नामदेव कोळी यास काही लोकांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे जखमी झालेल्या नामदेव यास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच एरंडोलचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात लक्ष्मण गणपत माळी (वय ४३), आकाश सोमा कोळी (वय २७), राजेंद्र सुकदेव महाजन (वय ४०), सुकलाल ईश्वर माळी (वय ३७, सर्व रा. रवंजे, ता.एरंडोल) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले आहे. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हेही वाचा