उत्तर महाराष्ट्र

जळगाव : रेल्वेगाडीच्या अत्याधुनिक यंत्रणेच्या सतर्कतेने वेळीच आग आटोक्यात !

गणेश सोनवणे

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : अहमदाबाद-बैरानी एक्सप्रेसच्या रेल्वेगाडीला आग लागल्याची माहिती मिळाल्याने प्रशासन यंत्रणाची धावपळ झाली. यावेळी महापालिकेचे तीन अग्निशमन बंब आणि रेल्वे प्रशासनाने अलर्टच्या माध्यमातून किरकोळ आग आटोक्यात आणली. यावेळी महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली.

सविस्तर माहिती अशी की, जळगाव रेल्वे स्थानकावर (१९४८३) अहमदाबाद-बैरानी ही गाडी मुंबईकडून भुसावळकडे जात असतांना डाऊन एक्सप्रेसच्या एस ७ बोगीच्या चाकाजवळ आग लागत असल्याची माहिती सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अत्याधुनिक यंत्रणेमुळे मिळाली होती. त्यानुसार जळगाव रेल्वे प्रशासनाने तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागाला फोन लावून माहिती दिली. यावेळी महापालिकेचे दोन आणि जैन इरिगेशनचा एक असे तीन बंब रेल्वे स्थानकाजवळ दाखल झाले. तर महापौर जयश्री महाजन आणि कुलभूषण पाटील यांना देखील माहिती मिळाल्यानंतर त्यांनी देखील रेल्वे स्थानकात धाव घेतली. रेल्वे प्रशासन व महापालिकेच्या प्रशासनच्या सतर्कतने यंत्रणा कामाला लागली.

फायर ईन्स्टींग्यूशरच्या मदतीने किरकोळ आग विझविण्यात आली. सुदैवाने अत्याधुनिक यंत्रणेमुळे हा प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. जळगाव मनपाचे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहा. अग्निशमन अधिकारी सुनील मोरे, फायरमन अश्वजित घरडे, तेजस जोशी, वाहन चालक वसंत न्हावी, भारत बारी, रवी बोरसे, नितीन बारी, वाहन चालक नारायण चांदेलकर, शिवा तायडे, पुंडलिक सपकाळे, वाहन चालक विक्रांत घोडेस्वार, सोपान कोल्हे, निलेश सुर्वे, नंदकिशोर खडके आदींनी सहकार्य करण्यासाठी धाव घेतली होती.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.