उत्तर महाराष्ट्र

नाशिक : शेळ्यांसाठी पाला तोडणे बेतले जीवावर, झाडावरून पडल्याने मुलाचा मृत्यू

गणेश सोनवणे

नाशिक (नांदगाव) पुढारी वृत्तसेवा ; शेळ्यांसाठी झाडाच‌ा पाला तोडताना तोल जाऊन खाली पडल्याने १६ वर्षीय मुलाच‌ा मृत्यू झाल्याची घटना नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे घडली.

साकोरा येथे शेतकरी असलेले सुरसे कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे शेळ्या असल्याने कृष्णा नाना सुरसे हा मुलगा शेळ्यांसाठी पाला तोडण्यासाठी झाडावर चढला होता. झाडाची फांदी अचानक तुटल्याने तो खाली पडला. त्याला गंभीर मार लागल्याने नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान कृष्णाची प्राणज्योत मालवली. या घटनेबाबत नांदगाव पोलिसांमध्ये अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. त्याच्या पश्चात आजोबा, आजी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT