पळसे : वर्धापन दिनी लाडू वाटप करत साजरा करताना शाखाप्रमुख दिपक गायधनी, सरपंच प्रिया गायधनी, पांडुरंग गायधनी, रामकृष्ण गायखे, विष्णूपंत गायधनी, शिवाजी टावरे, समाधान गायधनी,नामदेव आगळे, शांताराम जाधव आदीसह शिवसैनिक  ( छाया : उमेश देशमुख ) 
उत्तर महाराष्ट्र

शिवसेना वर्धापनदिन : पळसेत लाडू वाटप करत उत्साहात साजरा

अंजली राऊत
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना शाखा पळसेच्या वतीने शिवसेना वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी व स्वाभिमानासाठी स्थापन झालेल्या शिवसेना पक्षाचा आज ५७ वा वर्धापन दिन 'शिवसेना' आमच्यासाठी फक्त संघटना किंवा पक्ष नसून शिवसेना म्हणजे वंदनीय बाळासाहेबांनी आमच्यावर केलेला संस्कार, विचार, आचार आहे. आज जो काही मान, सन्मान,  सामाजिक, राजकिय ओळख, प्रतिष्ठा मिळतेयं ती केवळ आणि केवळ शिवसेनेमुळेचं.!त्यामुळे यापुढेही जिवात जीव असेपर्यंत शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहायचा निर्धार व्यक्त करून, शिवसेना वाढीसाठी, जनतेच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व  जेष्ठ, निष्ठावंत, कडवट शिवसैनिकांना शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेना शाखेच्या वतीने शाखाप्रमुख दिपक गायधनी यांनी शुभेच्छा दिल्या. तर पळसे पंचक्रोशीत वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी दगुदादा गायधनी यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तर पंढरीनाथ गायधनी, निवृत्ती गायधनी यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. प्रिया गायधनी व नामदेव आगळे यांनी शिवसेना शाखा कार्यालयास पुष्पहार अर्पण केला. तसेच शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक व शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या निमित्ताने लाडू वाटप करण्यात आले. शाखाप्रमुख दिपक गायधनी, दिलीप गायधनी,भाऊसाहेब जाधव, दत्तात्रय सरोदे, विशाल धोंगडे, भगवान गायधनी, विजय गायधनी, समाधान गायधनी, रामकृष्ण गायखे, विष्णुपंत गायधनी, बाळासाहेब ढेरिंगे, शिवाजी टावरे, दत्तू गायधनी, लक्ष्मण गवळी, काळू थेटे आदींसह शिवसैनिक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT