उत्तर महाराष्ट्र

रामनवमी – 2023 : श्री काळाराम मंदिरास आकर्षक रोषणाई!

अंजली राऊत

नाशिक : चैत्र शुद्ध नवमी म्हणजे चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार मानले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर रामजन्माचा सोहळा होतो. यानिमित्त पंचवटी येथील प्रसिद्ध काळाराम मंदिर संस्थानाकडून जन्मोत्सवाची जोरदारी तयारी सुरू आहे. संस्थानाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रोषणाईमुळे काळाराम मंदिर परिसर उजाळून निघाला आहे.
(छाया : हेमंत घोरपडे)

SCROLL FOR NEXT