निवडणूक www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा बिगुल वाजला, 10 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, 10 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. इच्छुक उमेदवारांना 3 नोव्हेंबरच्या सायंकाळी पाचपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहे, तर 71 मतदान केंद्रांमध्ये 20 नोव्हेंबरला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत नोंदणीकृत मतदारांना मतदानाचा हक्क बजविता येणार आहे, तर 22 नोव्हेंबरला विद्यापीठ प्रांगणात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम अंतर्गत विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधरांकडून विद्यापीठाच्या अधिसभेवर सदस्य निवडीसाठी निवडणूक सूचना जारी केलेली आहे. 18 ऑक्टोबरला प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीच्या आधारे ही निवडणूक घेण्यात येत आहे. पुणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या पुण्यासह नाशिक व नगर जिल्ह्यांतील मतदारांना निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. 10 जागांपैकी पाच जागा खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत, तर पाच जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व महिला उमेदवारासाठी जागा राखीव असणार आहे.

दरम्यान, शहरातील एचपीटी व आरवायके महाविद्यालय, व्ही. एन. नाईक, भोसला महाविद्यालय, के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, सिडको महाविद्यालय, नाशिकरोड बिटको महाविद्यालय या केंद्रांमध्ये मतदान होणार आहे, तर ग्रामीण भागात सिन्नर महाविद्यालय (सिन्नर), दिंडोरी मविप्र महाविद्यालय, के. के. वाघ महाविद्यालय (पिंपळगाव बसवंत), नूतन महाविद्यालय (लासलगाव), गणपत दादा मोरे महाविद्यालय (निफाड), मविप्र महाविद्यालय (मनमाड), कळवण एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय, एसएनजेबी महाविद्यालय (चांदवड), आहेर महाविद्यालय (देवळा), सोनवणे महाविद्यालय (सटाणा), गायकवाड महाविद्यालय (मालेगाव कॅम्प), स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालय (येवला) हीे केंद्रे मतदानासाठी निश्चित करण्यात आली आहेत.

निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत -3 नोव्हेंबर सायंकाळी 5 पूर्वी
नामनिर्देशन अर्जाची छाननी- 4 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजेपासून
नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची मुदत -5 नोव्हेंबर सायंकाळी 5 पूर्वी
मतदान- 20 नोव्हेंबर
मतपत्रिका छाननी व मतमोजणी- 22 नोव्हेंबर

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT