Murder Case Pudhari
नाशिक

Ozar Murder Case | ओझर येथे भरवस्तीत तरुणाचा खून; संशयित मित्र फरार

Ozar Murder Case | ओझर येथील संभाजी चौक परिसरात एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

ओझर : पुढारी वृत्तसेवा
ओझर येथील संभाजी चौक परिसरात एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कमोद फोटो स्टुडिओ समोर असलेल्या एका घरात तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृत तरुणाचे नाव विनोद विष्णू शेंडे (३४) असे असून, तो मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब गावचा रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

सध्या तो ओझर येथील एका किराणा दुकानात काम करत एका मित्रासोबत राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहाच्या मानेवर गळा आवळल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे हा खूनच असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटना घडल्यानंतर त्याच्यासोबत राहणारा मित्र फरार झाला असून, पोलिसांना त्याच्यावर संशय आहे. घटनेची माहिती मिळताच ओझर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी महेश कुलकर्णी यांच्यासह पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फरार मित्राचा शोध पोलिस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT