Nashik unseesnol rain | येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात गारपीठीसह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी ! 
नाशिक

Nashik unseasonal rain | येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात गारपीठीसह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी !

शेतकऱ्याची धावपळ शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

पुढारी वृत्तसेवा

नगरसुल: रविवार दिनांक २८/३/२०२६ रोजी दुपारी ३.२५दरम्यान विजेच्या कडकडाटासह तुफान वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पावस झाला असून ह्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच पळापळ केली.

आकाशात तळपणारा सुर्य आग ओकत जिवाची नुस्ती लाहीलाही होत असतानाच आकाशात ढगांची एकच गर्दी तुफाणवारा विजाचा कडकडासह गारांचा पाऊस झाल्याने नगरसुल गावचा उत्तर शिवार सानप वस्ती धनगरवाडी , अंबुमाळी मळा, कुडके वस्ती , बागलमाथा, नांदगाव रोड सह हडपसावरगाव, लहीत जायदरे, खिर्डीसाठे, पिंपळखूटे पन्हाळे , कोळगाव,रावते वस्ती, काही भागात गारा मोठ्या प्रमाणात पडल्या कांद्याच्या पोळीवर टाकलेले कागद उघडुन गेल्याने कांद्याच्या पोळी भिजल्या, काढणीला आलेला गहू, हरबरा लसुन यांचे चांगलेच नुकसान झाले.

त्याचप्रमाणे खिर्डीसाठे येथील अर्जुन साळूबावा कांगणे यांच्या शेतात काढलेला उन्हाळ कांदा गाराच्या पावसाने जोडप्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच नगरसुल येथील प्रगतीशील शेतकरी प्रकाश जगन्नाथ निकम यांच्या शेतातील चिक्कू बागाचे वादळी वाऱ्याच्या पावसामुळे पक्व झालेली फळे व झाडे उमरून पडल्याने जवळपास अंदाजे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. तसेच त्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा करणारे विजेच्या खांबांचे पडझड झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT