ड्रोन शिक्षणक्रमासाठी 'मुक्त'तर्फे प्रवेश सुरू झाले आहेत.  file photo
नाशिक

YCMOU Nashik | ड्रोन शिक्षणक्रमासाठी 'मुक्त'तर्फे प्रवेश सुरू

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या निरंतर विद्याशाखेंतर्गत ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित प्रमाणपत्र शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरू झाले. प्रवेशाची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत असणार आहे. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या बदलत्या काळानुसार शिक्षण देण्याच्या संकल्पनेचे एक पुढचे पाऊल म्हणून या शिक्षणक्रमाची सुरुवात विद्यापीठामार्फत करण्यात येत आहे.

ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या www.ycmou.ac.in आणि http://ycmou.digitaluniversity.ac या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन निरंतर विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम यांनी केले.

प्रमाणपत्र शिक्षणक्रम आणि त्यामध्ये समाविष्ट विषय :

१) ड्रोन प्रणाली परिचय कार्यक्रम : ड्रोन प्रणालीची समज, ड्रोनचे प्रकार, ड्रोन सुरक्षा, सिम्युलेटर फ्लाइंग.

२) ड्रोन सिस्टम इंटरमीडिएट कार्यक्रम : एरोनॉटिक्स, रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्सची तत्त्वे, ड्रोननिर्मिती आणि उडवणे, नियम आणि सुरक्षा, सिम्युलेटर प्रशिक्षण उड्डाण.

३) ड्रोन सिस्टम ॲडव्हान्स कोर्स: एरोनॉटिक्स, रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स मूलभूत गोष्टी, सानुकूल पेलोड डिझाइन तयार करणे, उद्योग साधने आणि सेन्सर्ससह हाताने प्रशिक्षण, नियमन आणि व्यावसायिक अनुप्रयोग, क्लासरूम, सिम्युलेटर आणि फ्लायड फ्लाइंग सेशन.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT