नाशिक : निल कुलकर्णी
शंभरापैकी तीन ते चार लाेक मानसिक आजाराने ग्रस्त असून देशातील सात पैकी एक व्यक्ती सौम्य किंवा तीव्र मानसिक आजाराने गस्त असतो, असा अभ्यास देशातील मानसिक आजारांवर सर्वेक्षण, अभ्यास सायकियाट्री जर्नलवरुन प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून समाेर आला आहे. १५ ते २० टक्के लोकांना ड्रिप्रेशन तर ५ टक्के १० टक्के लोकांना 'ॲनझायटी'चा त्रास असल्याचेही मानस आजार तज्ज्ञांच्या केसेस वरून दिसून आले आहे.
'आपत्पकालिन स्थिती, नैसर्गिक संकटात मानसिक आरोग्य सेवांमध्ये प्रवेश' हा यंदाच्या मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे. जगात ३५० पेक्षा अधिक मानसिक आजार आहेत. त्यातील काही आजार सौम्य असतात. साैम्य मानसिक आजाराची लक्षणे असणारे आणि त्याची जाणीव नसणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, असा अभ्यास मानसोपचार तज्ज्ञांच्या अभ्यासात येत आहे. राज्यसह देशात व्यसनाधिनता, अनझायटी (चिंतारोग,बैचेनी), ड्रिप्रेशन या आजारांनी ग्रस्त लोकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. 'माईल्ड काग्नेटिव्ह इंम्पेरीमेंट' (सौम्य प्रकारचा विसरभोळेपणा) डिप्रेशनसह, 'ओसीडी' यासारखे आजार आढळतात. व्यसनाधिनता आणि, आवेगात्मक वर्तन (इंम्पलसिव्ह डिसअॉर्डर) हे दोन मानसिक आजार आजच्या तरुणांलाईला जडले असून त्याबद्दल चिंताही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. लहान मुलांमध्ये अतीचंचलता, शाळेबद्दलची, अंधाराची भीती, आवेगात्मक वर्तन यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येतात.
ऑबसेसिव्ह कंम्पलसिव्ह न्युरोसिस हा आजार 'सायकाेसिस' आणि 'न्युराेसिस' या दोन्ही प्रकारात येतो. ज्यांना हा आजार झाला आहे. ते सायकोसिस मध्ये येतात. तर ज्यांना या आजाराची जाणीवच नसते असे रुग्ण न्युरोसिस मध्ये मोडतात, अशी माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. महेश भिरुड यांनी दिली.
समाज मानसिक आजारांबद्दल फार सावकाश जागृत होत आहे. तरीही आज समाजामध्ये मानसिक आजारांबद्दलची जाणीव आणि जागरूकता, दिवसेंदिवस मानसिक आजारांबद्दल घटणारी कलंकित प्रतिमा, प्रतिमाबंधांबद्दल घेतली जाणारी काळजी आणि मानसिक स्वास्थ्याबद्दल वाढणालेली उपलब्धा यामुळे मानसिक आजारी व्यक्ती मानसोपचार तज्ज्ञांपर्यत पोहचत असल्याने या आजारांवर मात करण्यात रुग्णांना यश येत असल्याचेही मानसोपचार तज्ज्ञांनी नमूद केले.
मानसिक आजाराचे प्रमाण (टक्केवारीत)
ओसीडी (ऑबसेसिव्ह कंप्लिसिव्ह डिसऑर्डर)- २ ते ३
डिप्रेशन- १५ ते २०
अनाझायटी- ५ ते १०
स्किझोफ्रेनिया 1 ते ५
बायपोलार-1 ते 3
अनुवंशिकता, मेंदूमध्ये होणारे रसायनिक बदल, दैनंदिन जीवनातील वाढते ताण तणाव, अमली पदार्थांचे वाढते प्रमाण, दीर्घकालीन शारीरिक आजार, मोबाइल अन् सोशल मीडियाचा वाढता वापर, सामाजिक- आर्थिक असमानता, शहरीकरण, आर्थिक दुर्बलता, कर्जबाजारीपणा, एकटेपणा, हिंसाचार, मानसिक आघात, स्थलांतर, भेदभाव, सामाजिक मूल्यांमध्ये होणारे अमुलाग्र बदल यामुळे मानसिक आजारात वाढ झाली आहे. सौम्य मानसिक आजार असणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण वाढले आहे. परंतु अापल्याला असा सौम्य आजार आहे, ही जाणिवच त्यांच्यात नसल्याने ते उपचार घेत नाहीत.डॉ. महेश भिरुड, मानसोपचार तज्ज्ञ.
चित्रपटातून जनजागृती
मराठी नाटक, चित्रपट, माहितीपट हे माहितीरंजनातून मानसिक आजाराव भाष्य करत रुग्णांना डॉक्टरांपर्यंत पोहोचवण्यास मदत करत आहे. अतुल कुलकर्णी अभिनीत 'देवराई' प्राजक्त देशमुख अभिनीत 'तो एक राजहंस', कासव या चित्रपटातून मानसिक आजारावर प्रभावीपणे भाष्य करण्यात आले आहे. नाही हाकारा पण उठले रान, घरटे समोर सापडेना वाट, बेभान पाखरु समजेना कोणा..का कल्लोळ? कल्लोळ, या कवितेच्या ओळीप्रमाणे मानसिक आजारी व्यक्तींमधील कल्लोळ जाणून त्याला आधार, उपचार साथ द्यावी, अशी चळवळ उभी राहत आहे.