नाशिक : निल कुलकर्णी
भारतात ब्रेन ट्यूमर अर्थात मेंदूतील गाठ याबाबत बहुतांश नागरिकांमध्ये अनभिज्ञता दिसून येते. याचे निदान आणि व्यवस्थित उपचार झाल्यास या आजाराचा रुग्ण पूर्णपणे बरा होऊन सामान्यांप्रमाणे निरोगी आयुष्य जगू शकतो. देशातील १ लाख लोकसंख्येपैकी दरवर्षी ८ ते १० व्यक्ती ब्रेन ट्यूमरने ग्रस्त होतात. अशी माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली.
प्रत्येक गाठ म्हणजे कर्करोग नव्हे, तज्ज्ञांचे मत
ब्रेन ट्यूमर म्हणजे मृत्यू नव्हे. उपचारानंतर रुग्ण ठणठणीत
अन्य ठिकाणी झालेल्या कर्करोगामुळेही मेंदूत गाठ शक्य
'जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशन'ने २००० या वर्षी जगात सर्वप्रथम जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस जागृतीसाठी साजरा केला. त्या वर्षीपासून प्रत्येक ८ जून ला हा दिवस जगात साजरा केला जात आहे. 'ब्रेन ट्यूमर' म्हणजे मृत्यू अशी धारणा आपल्याकडे दिसून येत असे. मात्र, उपचारांती पूर्णपणे बरा होणारा असा हा आजार आहे. करिता 'जागृती वाढवणे अन् आशा वाढवणे' अशी यंदाच्या ब्रेन ट्यूमर दिनाची संकल्पना आहे. 'ट्यूमर' म्हणजे शरीरात होणारी गाठ. मेंदूच्या कुठल्याही भागात होणारी गाठ ही 'ब्रेन ट्यूमर' असते. मात्र शरीरातील प्रत्येक गाठ ही कर्कराेग असेलच असे नव्हे, तर काही गाठी कर्करोगाच्या नसतात. त्यावर उपचार होतात, अशी माहिती प्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ सर्जन डॉ. श्रीपाल शाह यांनी 'पुढारी'शी बोलताना दिली.
रुग्णाला अचानक उलट्या होणे, डोक्याची बाजू जड पडणे.
तीन- चार महिने डोके दुखणे (हळूहळू वाढणारी लक्षणे)
वरील लक्षणे दिसल्यास आणि निदानातून निष्पन्न झाल्यास तो 'ब्रेन ट्यूमर' असतो.
प्राथमिक कर्करोग शरीराच्या दुसऱ्या भागात होतो परंतु पहिली गाठ मेंदूत होऊ शकते.
लक्षणे दिसल्यास मेंदूविकार तज्ज्ञांकडून निदान आणि उपचार करून घ्यावेत. प्रत्येक ब्रेन ट्यूमर कर्करोगाची गाठ असेलच असे नसून, आज नवतंत्रज्ञानाने ब्रेन ट्यूमरवर यशस्वी मात करता येते. यातून रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शक्तो.डॉ. श्रीपााल शाह, मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ व सर्जन, नाशिक.